गर्दीत सामान्यांना वेश्यागमनाकडे ओढण्याचा प्रकार !
मुंबई, १६ फेब्रुवारी (वार्ता.) – शहरातील दादर रेल्वेस्थानकावर सायंकाळी कार्यालयीन कामकाज बंद होण्याच्या वेळेत भर गर्दीत वेश्यांना उभे करण्यात येते. या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना वेश्यागमनाकडे ओढण्याचा गंभीर प्रकार चालू आहे. सायंकाळी थोडा अंधार पडल्यावर ६ वाजताच्या वेळेत दादर रेल्वेस्थानकाच्या पूर्व भागातील कैलास लस्सी येथून पश्चिमेकडे जाण्यासाठी असलेल्या जिन्याच्या पायर्यांवर वेश्यांना रात्री उशिरापर्यंत उभे करण्यात येत आहे. जिन्याच्या पायर्यांवरून फलाटावर जाईपर्यंत ७-८ वेश्या काही अंतरावर उभ्या असतात.
१. या वेळी एक मुख्य महिला जिन्यावर उभ्या असणार्या वेश्यांवर लक्ष ठेवत असल्याचे आढळून आले. मुंबईतील एखाद्या कुंटणखान्यातून या वेश्यांना दादर रेल्वेस्थानकावर उभे करण्यात आले असण्याची शक्यता आहे.
२. सर्वसामान्य नागरिकांना वेश्यागमनाकडे ओढण्याचा हा प्रकार उघडपणे चालू असूनही रेल्वेस्थानकावरील पोलीसही त्यांना हटकत नाहीत. आतापर्यंत मुंबईतील कुंटणखान्यांच्या बाहेर वेश्या उभ्या रहायच्या; मात्र सध्या मुंबईत रहदारीच्या ठिकाणी वेश्या उघडपणे उभ्या रहात आहेत. (वेश्या उघडपणे अशा रस्त्यावर येऊ लागल्या तर भविष्यात मुंबईत काय परिस्थिती ओढावू शकते, याची कल्पनाही करता येणार नाही ! – संपादक)
३. केवळ दादरच नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट, अन्य उपनगरे, येथेही असे प्रकार चालू असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. मुंबईबाहेर जाणार्या मुख्य रस्त्यांवरही सायंकाळनंतर मध्यरात्रीपर्यंत वाहनचालकांना आकर्षित करण्यासाठी निर्जन रस्त्यांवर तोकडे कपडे घालून वेश्या उभ्या असल्याचे प्रकार सर्रासपणे चालू आहेत. हे उघडपणे चालू असूनही पोलीस, प्रशासन आणि शासनकर्ते यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
संपादकीय भूमिकाभर गर्दीत वेश्यांनी सामान्य नागरिकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करणे सामाजिक र्हासाचाच प्रकार होय ! हा प्रकार गंभीर असून कुणाच्या तक्रारीची वाट पहाण्यापेक्षा प्रशासनाने स्वत:हून हे प्रकार रोखायला हवेत. महाराष्ट्रासारख्या संतभूमीत असे प्रकार शोभनीय नाहीत ! |