पुणे रेल्वे जंक्शन यार्डमध्ये उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्याला भीषण आग !

पुणे – येथील स्थानकात क्वीन्स गार्डनच्या शेजारी यार्डमध्ये उभ्या असलेल्या रेल्वेच्या स्लिपर कोचच्या डब्याला रात्री २ वाजता भीषण आग लागली. ही आग एवढी भीषण होती की, आगीचे लोट मोठ्या प्रमाणात हवेत दिसत होते. ही आग नेमकी कशी लागली, हे समजू शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्नीशमनदलाने घटनास्थळी जात आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत रेल्वेचे आणखी २ डब्बे जळले. या घटनेत सुदैवाने जीवित हानी झाली नाही. रेल्वे अधिकारी या घटनेचे अन्वेषण करत आहेत.