पुणे जिल्ह्यांतील ५०७ शाळाबाह्य मुलांपैकी २८१ मुलांना शाळेत घेतले !

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने जुलै महिन्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी अभियान राबवण्यात आले होते. त्यामध्ये ५०७ मुले शाळाबाह्य असल्याची आढळून आली. त्यापैकी २८१ मुलांना शाळेमध्ये सामावून घेण्यात आले.

प्रतिकात्मक छायाचित्र

उर्वरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न चालू असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय नाईकडे यांनी दिली.