चाकण (जिल्हा – पुणे) – पुणे-नाशिक रेल्वे संदर्भात काहीजण हा प्रकल्प माझ्यामुळे आला असे भासवून, रेल्वे प्रकल्पाच्या मंजुरीचे फलक लावून नागरिकांची दिशाभूल करत आहेत. यावर कुणीही नागरिकांची दिशाभूल करू नये, असा सल्ला शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विरोधकांना दिला. या प्रकल्पासाठी २६ वर्षांचा पाठपुरावा असून त्यातील गेली
१५ वर्षे मी पुणे-नाशिक सेमी ‘हायस्पीड’ रेल्वे प्रकल्प मंजूर होण्यासाठी अनेक मंत्र्यांकडे पाठपुरावा केला आहे. चाकण येथे शिवसेनेच्या वतीने विविध विकासकामांच्या भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते. चाकण शहरासाठी ६३ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना राबवणार आहे, असेही त्यांनी सांगितले.