स्वप्नील लोणकर आत्महत्येच्या निषेधार्थ पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन !

विद्यार्थ्यांचे आंदोलन

पुणे, ७ जुलै – स्वप्नील लोणकर या एम्.पी.एस्.सी. परीक्षेच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर या घटनेच्या निषेधार्थ स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागावा आणि स्वप्नील लोणकरला न्याय मिळावा या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले. स्वप्नीलच्या आत्महत्येला महाराष्ट्र सरकार उत्तरदायी आहे, असे म्हणत या विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या.