पुणे – भारतात ऋषींनी काळाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या विचारांनी समाजाला जागृत करण्याचे कार्य केले आहे. या विचारांच्या आधारे एम्.आय.टी. संस्थेने संस्कृतीच्या जागराचे चालू केलेले कार्य मार्गदर्शक आहे. भक्ती, ज्ञान आणि कर्म यांच्या साहाय्याने चारित्र्यसंपन्न समाज घडवण्याचे कार्य करावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
भक्ती, ज्ञान आणि कर्माने स्वतः चारित्र्यवान होत चारित्र्यसंपन्न समाज आणि विश्वबंधुत्वाची भावना प्रस्थापीत करण्याचे कार्य करा. बौद्धिक, अध्यात्मिक आणि शारीरिक शक्तीच्या समन्वयाने जगात संतुलन स्थापित होईल-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी..२/२ pic.twitter.com/M4KEcGvd5k
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) November 30, 2021
एम्.आय.टी. विश्वशांती विद्यापीठ पुणे येथे आयोजित २६ व्या संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज व्याख्यानमालेच्या प्रसंगी ते बोलत होते.