पुणे – जागतिक स्तरावर पसरत असलेल्या कोरोनाच्या नवीन ‘स्ट्रेन’ (प्रकार) संदर्भात तज्ञांची वेगवेगळी मते आहेत. ‘काही बंधने पुन्हा आणावी लागतील’, असे आरोग्य क्षेत्रातील तज्ञांची मते आहेत. राज्यात नेमकी काय काळजी घेता येईल ? यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. सध्या तरी पुणे तसेच पिंपरी-चिंचवडमधील ‘जम्बो कोविड सेंटर’ चालूच राहील आणि ३१ डिसेंबरला आढावा घेऊन पुढील निर्णय घेऊ, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे सांगितले.