मणेरवाडी (पुणे) येथे १५ वर्षीय मुलाची हत्या !

मैत्रीतून झालेल्या चुकीच्या समजुतीतून २ अल्पवयीन मुलांनी प्रकाश राजपूत या १५ वर्षीय शाळकरी मुलाची कोयत्याने वार करून हत्या केली. ही घटना मणेरवाडी (खानापूर, सिंहगड पायथा) परिसरातील आनंदवन सोसायटीमध्ये १८ मार्च या दिवशी दुपारी घडली.

ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेच्या अभ्यासक्रमात तब्बल २८ वर्षांनी पालट !

नव्या अभ्यासक्रमाच्या संदर्भात नवीन कार्यपद्धतीही लागू केली असून त्याची कार्यवाही वर्ष २०२५ पासून करण्यात येणार आहे.

शहराबाहेर ‘पी.एम्.पी.एम्.एल्.’चे डेपो उभारणीच्या प्रस्तावांवर कोणताही निर्णय नाही !

सध्या शहरांमध्ये पी.एम्.पी.एम्.एल्.चे १५ डेपो असून काही नव्या डेपोंची आवश्यकता आहे. या बससेवेचा लाभ घेणारे बहुतांश प्रवासी शहराच्या हद्दीबाहेरचे आहेत.

पुणे येथील ससूनच्या अधिकार्‍याच्या विरोधात राज्य माहिती आयोगाची शिस्तभंगाची कारवाई !

माहिती लपवणे आणि खोटी माहिती पुरवल्याचे प्रकरण !

पुणे जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, तसेच खडकवासला कालवा विभाग यांना निवेदन सादर !

खडकवासला जलाशय रक्षणासाठी आवश्यक ते सहकार्य मिळण्याविषयी निवेदन अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे विभाग पुणे आणि कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे यांना देण्यात आले.

कोंढवा पशूवधगृहाचे खासगीकरण अवैध आणि रहित करण्याचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना निवेदन !

१८ मार्च या दिवशी अतिरिक्त आयुक्तांच्या निवेदनासह कोंढवा येथील ४ सहस्र नागरिक आणि ३० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या अधिकार्‍यांनी मा. आयुक्त, महापालिका यांना निषेधाचे पत्रही दिले आहे.

हिंदु जनजागृती समिती आयोजित पुणे येथे ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ मोहीम !

मोहिमेच्या अंतर्गत व्याख्यान, तसेच पुणे येथील मल्हार गडाची स्‍वच्‍छता आणि संवर्धन !

पुणे येथील आस्थापनावर अंमलबजावणी संचालनालयाने कारवाई करून कोट्यवधींची मालमत्ता शासनाधीन केली !

गुंतवणूकदारांची १२५ कोटी रुपयांची फसवणूक करणार्‍या विनोद खुटे याच्यावर कारवाई झाली आहे . खुटे याने ‘धनश्री मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी’ स्थापन करून गुंतवणूकदारांना चांगल्या व्याजाचे आमीष दाखवून त्यांची फसवणूक केली.

आळंदी (पुणे) येथील ज्ञानेश्वर माऊलींच्या ‘सिद्धबेटा’तील सभागृहाची दुरवस्था !

सिद्धबेट येथे ‘राज्य तीर्थक्षेत्र विकास आराखड्या’तून लाखो रुपये व्यय करून वारकर्‍यांसाठी सभागृह बांधण्यात आले आहे; परंतु त्याचा वापर होत नसल्याने सर्वत्र अस्वच्छता, कचरा, धूळ, तसेच मद्याच्या रिकाम्या बाटल्याही येथे आढळल्या.या सभागृहाकडे आळंदी नगर परिषदेचेही दुर्लक्ष होत आहे.

पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर !

महापालिका आयुक्त तसेच प्रशासक विक्रम कुमार यांनी ११ सहस्र ६०१  कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले. भारतीय जनता पक्षाच्या महापालिकेतील कार्यकाळात मांडण्यात आलेल्या…