गावांच्या विकासासाठी पी.एम्.आर्.डी.ए. ला नियुक्त करण्याचा राज्य सरकारचा निर्णय कायदेशीर नाही ! – भाजपचा आरोप

गावांसंदर्भात राज्य सरकार दुटप्पी भूमिका घेत असून महापालिकेच्या मूलभूत अधिकारांवर घाला घालत असल्याची भूमिका भाजपने घेतली आहे.

पुणे येथील गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंदऋषीजी चौकातील पाडलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला १ वर्षानंतरही प्रारंभ नाही !

पुलाचा आराखडा सिद्ध होऊनही पुणे महापालिकेने त्याला मान्यता दिलेली नाही. तसेच पुलाच्या प्रस्तावित आराखड्याची संकल्पचित्रे देण्याची मागणी करूनही पी.एम्.आर्.डी.ए. कडून टाळाटाळ केली जात आहे.

पुणे महापालिकेच्या वतीने ‘रेड लाईट’ भागात देवदासी भगिनींसाठी विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन !

२२० देवदासी भगिनींना आणि त्यांच्या कुटुंबियांना कोव्हिशिल्ड लस देण्यात आली. या वेळी देवदासी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सदनिकेच्‍या क्षेत्रफळानुसारच देखभाल शुल्‍क आकारण्‍याचे सहकार विभागाचे आदेश !

सहकारी गृहनिर्माण संस्‍थेमधील सदनिकांच्‍या क्षेत्रफळानुसारच सोसायटीने देखभाल शुल्‍क (मेंटेनन्‍स चार्जेस) आकारावे, असा आदेश सहकारी संस्‍था पुणे शहर एकचे उपनिबंधक दिग्‍विजय राठोड यांनी दिला आहे.

गुण वाढवून देतो असे सांगत विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करणार्‍या पुणे येथील कर्मचार्‍याच्या तोंडाला काळे फासून धिंड काढली !

अशा वासनांधांना कठोर शिक्षा करायला हवी तरच ते असा गुन्हा करण्यास धजावणार नाहीत !

पुण्यातील महिला डॉक्टरच्या स्नानगृहामध्ये छुपे कॅमेरे लावणार्‍या आधुनिक वैद्यांना अटक !

उच्चशिक्षित आधुनिक वैद्यांना न शोभणारी घटना ! असे आधुनिक वैद्य वैद्यकीय क्षेत्राला कलंकच आहेत. वासनेच्या आहारी गेलेल्यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे.

महापालिकेने नेमलेल्या लेखापरीक्षकांनी खासगी रुग्णालयांच्या देयकांची रक्कम अल्प करण्यास भाग पाडले !

रुग्णांच्या देयकांची रक्कम अल्प करण्यासमवेत अधिक रक्कम लावलेल्या रुग्णालयांना शिक्षा होणे अपेक्षित आहे !

बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी गुन्हा नोंद !

बैलगाडा शर्यतीवर बंदी असतांनाही मावळातील शिवणे गावाच्या हद्दीत मोकळ्या माळावर बैलगाडा शर्यतीचे आयोजन करणार्‍या २० युवकांवर वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून पोलिसांनी आयोजकांना कह्यात घेतले आहे.

चांगली नोकरी लावण्याच्या आमीषाने फसवणार्‍या ‘कॉल सेंटर’वर सायबर पोलिसांची कारवाई !

चांगल्या पगाराची नोकरी लावण्याच्या आमीषाने फसवणार्‍या ‘कॉल सेंटर’वर कारवाई करण्यात सायबर पोलिसांना यश मिळाले असून ४ जणांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. समाजाची नीतीमत्ता खालावत चालल्याचे उदाहरण !

पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी रवींद्र बिनवाडे यांची निवड

बिनवाडे हे मूळचे बीडचे असून, ते वर्ष २०१२ च्या तुकडीचे प्रशासकीय अधिकारी आहेत.