पुण्यातील जर्मन बेकरी स्फोटात पी.एफ्.आय.चा सहभाग असल्याचे पुरावे !

राज्य आतंकवादविरोधी पथकाची न्यायालयामध्ये माहिती ! वर्ष २०११ मध्ये पुण्यात झालेला जर्मन बेकरी बाँबस्फोट आणि भाग्यनगर येथील दुहेरी स्फोट यांमध्ये या संघटनेचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पुरावे समोर येत आहेत.

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.)’ला समर्थन आणि राष्ट्रहिताला लाथ !

देशाचे इस्लामी राष्ट्रात रूपांतर करू पहाणार्‍या जिहाद्यांना तात्काळ कठोर शिक्षा सुनावून त्याची प्रभावी कार्यवाही करा !

अमरावती येथे पी.एफ्.आय. संघटनेच्या जिल्हा संयोजकाच्या दुकानावर पोलिसांची धाड !

या वेळी पोलिसांनी काही साहित्य या ठिकाणाहून जप्त केले आहे. या दुकानाचा वापर तो ‘पी.एफ्.आय.’च्या कामकाजासाठी करत असल्यामुळे ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.

पुणे येथे भाजयुमोने एम्.आय.टी. महाविद्यालयातील पाकचा ध्वज जाळला !

आपल्याला आपल्या देशातील शिक्षणसंस्थेमध्ये पाकिस्तानचे झेंडे कशाला हवेत ? असा प्रश्न उपस्थित करत भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कोथरूडमधील एम्.आय.टी. शिक्षणसंस्थेमध्ये जाऊन पाकिस्तानचा ध्वज जाळला आहे.

(म्हणे) ‘सरकारने सनातन आतंकवादी संघटनांवर बंदी घालावी !’

हिंदुत्वनिष्ठ संघटनांविरुद्ध कोणतेही पुरावे नसतांना त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप करणारे लोकप्रतिनिधी ! हिंदूंच्या कोणत्या संघटनेने सहस्रोंचे बळी घेतले, हेही खासदार महाशयांनी सांगावे !

भारतात पाकिस्तान सरकारच्या टि्वटर खात्यावर बंदी

भारत सरकारने पाकिस्तान सरकारच्या टि्वटर खात्यावर भारतात बंदी आणली आहे. भारताने नुकतीच ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर ५ वर्षांसाठी बंदी घातल्यावर या खात्यावरून त्यावर टीका करणारे ट्वीट करण्यात आले होते. यामुळेच ही बंदी घालण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

दिवाळीमध्ये हिंदुबहुल भागात बाँबस्फोट करण्याचा ‘पी.एफ्.आय.’चा होता कट !

जिहादी आतंकवादी संघटनांना धर्म असतो, हे आतातरी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी मान्य करतील का ?

पी.एफ्.आय.वरील बंदीचे समर्थन करणार्‍या मौलानांना जीभ कापण्याची धमकी

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) या संघटनेवरील बंदीचे समर्थन करणारे येथील मौलाना शहाबुद्दीन रिझवी यांना त्यांची जीभ कापण्याची धमकी दूरभाषवरून देण्यात आली. धमकी देणार्‍याने स्वतःचे नाव अब्दुल समद असे सांगितले.

पी.एफ्.आय.चा आर्थिक स्रोत बंद केल्याविना तिच्या आतंकवादी कारवाया थांबणार नाहीत ! – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

जी इस्लामी राष्ट्रे, तसेच देशातील अन्य संघटना ‘पी.एफ्.आय.’ला आर्थिक साहाय्य करत आहेत, त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय कायद्याअंतर्गत कारवाई करायला हवी.

संभाजीनगर येथे ‘पी.एफ्.आय.’ने घेतलेल्या कार्यक्रमांना पैसा देणार्‍या स्रोतांची कसून चौकशी चालू !

२७ सप्टेंबरच्या पहाटे अन्वेषण यंत्रणेने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईत १४ जणांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्या वेळीही संभाजीनगर येथे संघटनेचे सर्वाधिक मोठे जाळे पसरल्याचे समोर आले होते.