श्रीरामांचा अवमान केल्यामुळेच कट्टर शहरी नक्षलवादी अभिजीत दिपके यांच्यावर शाई फेकली ! – Barkha Trehan

बरखा त्रेहन यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून दिली माहिती

अभिजीत दिपके व बरखा त्रेहन

नवी देहली – येथील जंतर मंतर परिसरात आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पोलिसांनी सक्तीने आंदोलन स्थळावरून उचलून नेत सफदरजंग रुग्णालयात भरती केले. यासंदर्भात जंतर मंतरवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असतांना कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावर एका महिलेने गर्दीतून येऊन शाईफेक केली. यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बरखा त्रेहन यांना पकडून संसद मार्ग पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी कोणतीही लेखी तक्रार नसल्याने त्यांना सोडून दिले.

या संदर्भात बरखा त्रेहन यांनी त्यांच्या ‘एक्स’ खात्यावर पोस्ट करत म्हटले की, ‘होय, मी बरखा त्रेहन आणि त्या कट्टर शहरी नक्षल अभिजित दिपके याच्यावर मीच शाई फेकली; कारण जेव्हा माझ्या प्रभु श्रीरामाचा कॉकरोच जनता पक्षाच्या मंचावर अवमान झाला, तेव्हा तो हसला होता. मी एक कट्टर हिंदू आहे. मी प्रचंड विचलित झाले होते. मी या माध्यमातून माझा निषेध नोंदवला आहे. मला त्याचा गर्व आहे. जय हिंद, जय श्रीराम.’

हे ही वाचा → HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !

अभिजित दिपके यांच्या समर्थकांवर मारहाणीचा आरोप

बरखा त्रेहन यांनी आरोप केला की, जंतर मंतरवर अभिजित दिपके यांच्या गुंडांनी मला मारहाण केली. माझे केस ओढले. माझ्या छातीवर दाब दिला.

संपादकीय भूमिका

कॉकरोच जनता पक्ष हिंदुद्वेषी आणि साम्यवादी असल्याने त्याच्या नेत्यांकडून असेच होणार असल्याने धर्मप्रेमी यांना भीक घालणार नाही, हे या घटनेवरून लक्षात येते !