गुप्तार घाटावरील प्रकारामुळे संत-महंत संतप्त : धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील पवित्र शरयू नदीच्या गुप्तार घाटावर नावेत बसून मटण आणि मद्य यांची मेजवानी केल्याच्या प्रकरणी कँट पोलिसांनी लवकुश निषाद, राजकुमार निषाद अन् जितेंद्र निषाद या तिघांता अटक केली. या मेजवानीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपींना बेड्या ठोकल्या. एक आरोपी पसार झाला आहे. या घटनेमुळे पवित्र शरयू नदी अपवित्र झाल्याचा आरोप करत अयोध्येतील संत-महंत आणि भाविक यांनी याविषयी तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली, तसेच संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली.
गुप्तारघाट येथे प्रभु श्रीरामांनी अवतारसमाप्ती केली होती. त्यामुळे हिंदूंसाठी हे अत्यंत पवित्र स्थान आहे. येथे प्रतिदिन सहस्रो भाविक शरयू मातेची पूजा करतात आणि या पवित्र नदीत स्नान करतात.
यापूर्वी ‘राम की पैडी’ येथेही घडला होता बिभत्स प्रकार !
यापूर्वीही एक प्रकरण मोठ्या चर्चेत आले होते. अयोध्येच्या ‘राम की पैडी’ भागातही गेल्या वर्षी काही जोडप्यांना अश्लील चाळे करत जलक्रीडा करतांना पकडण्यात आले होते. त्यांच्यावरही पोलिसांनी कारवाई केली होती आणि अशा कृत्यांवर बंदी घालण्याचा आदेश दिला होता.
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Bangladesh Massive Protests : बांगलादेशात हिंदु तरुणाच्या अन्याय अटकेविरुद्ध अल्पसंख्यांकांची निदर्शने
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
श्रीरामांचा अवमान केल्यामुळेच कट्टर शहरी नक्षलवादी अभिजीत दिपके यांच्यावर शाई फेकली ! – Barkha Trehan