कर्नाटकातील भाजयुमोचे सदस्य प्रवीण नेट्टारु यांच्या हत्येत पी.एफ्.आय.च्या ४ कार्यकर्त्यांचा सहभाग

या चौघांची माहिती देणार्‍यांना एन्.आय.ए. बक्षीस देणार !

भाजयुमोचे सदस्य प्रवीण नेट्टारु (डावीकडे) त्यांच्या हत्येत सहभागी झालेले ४ पी.एफ्.आय. चे कार्यकर्ते (उजवीकडे)

बेळ्ळारे (कर्नाटक) – भाजप युवा मोर्चा समितीचे सदस्य प्रवीण नेट्टारु यांची जुलै मासामध्ये बेळ्ळारे येथील त्यांच्या ब्रॉयलर दुकानासमोर रात्री दुचाकीवरून आलेल्या ३ धर्मांध मुसलमानांनी वार करून हत्या केली होती.

या हत्येच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) प्रतिबंधित संघटना पॉक्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ४  सदस्यांची माहिती देणार्‍यांना रोख बक्षीस घोषित केले आहे. यामध्ये महंमद मुस्तफा आणि थुफैल एम्.एच्. या दोघांवर प्रत्येकी ५ लाख, तर उमर फारुख एम्.आर्. आणि अबुबकर सिद्दिकी यांच्यावर प्रत्येकी २ लाख रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले आहे. या हत्येच्या प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी शफिक बलेरे आणि झाकीर सावनुरू यांना अटक केली आहे.