धर्मांधाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी वारंवार मानसिक छळ आणि धमक्या !

पुणे – एका १८ वर्षीय हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी तिचा पाठलाग करणे, सतत नकार देऊनही वेगवेगळ्या भ्रमणभाष क्रमांकांवरून संदेश पाठवून त्रास देणे आणि धमकी देणे याप्रकरणी सुफियान खानविरुद्ध येथील समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तक्रारीनुसार पीडित हिंदु तरुणी आणि संशयित आरोपी सुफियान खान यांची शाळेत असतांना ओळख झाली होती. ऑक्टोबर २०२४ मध्ये सुफियानने तरुणीसमोर प्रेमप्रस्ताव ठेवला होता, ज्याला तरुणीने स्पष्ट नकार दिला. त्यानंतरही त्याने सातत्याने वेगवेगळ्या क्रमांकांवरून संदेश पाठवून तिचा मानसिक छळ चालूच ठेवला. तरुणीने त्याचे क्रमांक ब्लॉक केल्यानंतर सुफियानने त्याच्या इतर मित्रांच्या भ्रमणभाष क्रमांकांचा वापर करून त्रास देणे चालूच ठेवले. ‘माझ्याशी बोलली नाहीस, तर आत्महत्या करीन’, तसेच तरुणीच्या आजीच्या घराचे छायाचित्र पाठवून ‘माझे ऐकले नाहीस, तर गंभीर परिणाम होतील’, अशा धमक्या त्याने व्हॉट्सॲप संदेशांद्वारे दिल्या.

पीडितेने सुफियानचा क्रमांक ‘ब्लॉक’ केल्यानंतर तिची मैत्रीण मरियम शेख हिने पीडितेला भ्रमणभाष करून ‘तुम्ही पोलिसात तक्रार केली तरी सुफियानला काही होणार नाही’, अशी धमकी दिल्याचा उल्लेखही तक्रारीत केला आहे.

संपादकीय भूमिका

  • हिंदु तरुणींना जाळ्यात ओढण्यासाठी चालवल्या जाणार्‍या ‘लव्ह जिहाद’च्या मानसिकतेचे जिवंत उदाहरण म्हणजे ही पुणे येथील संतापजनक घटना ! 
  • पीडितेची मुसलमान मैत्रीणही यामध्ये सहभागी आहे, यावरून धर्मांधांचे ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात हिंदु तरुणींना ओढण्याचे षड्यंत्र किती नियोजनबद्धरित्या चालू आहे, हे लक्षात येते. हिंदु तरुणींनी सावध होऊन धर्मांधांसमवेत मैत्री किंवा प्रेमाच्या जाळ्यात अडकू नये, हे लक्षात घ्यायला हवे !