मुलांना सकस आहाराची सवय लावण्यासाठी कर्नाटक शासनाचा निर्णय

मंगळुरू (कर्नाटक) – विद्यार्थ्यांना पौष्टिक आहाराची सवय लावण्यासाठी शाळांजवळील पिझ्झा आणि बर्गर यांच्या विक्रीवर लवकरच बंदी घातली जाईल, अशी घोषणा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री यू.टी. खादर यांनी येथे केली.
🚫🍔 Big Move in Karnataka! 🍕❌
The Karnataka government is set to ban the sale of pizzas and burgers near schools to encourage healthier eating habits among children.
If a Congress-led government can take this bold step for children's health, why aren't other states following… pic.twitter.com/ujm7conjJ5
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 19, 2026
पत्रकारांशी बोलतांना खादर म्हणाले की,
विद्यार्थ्यांना होणार्या अनेक आजारांमागील खरे कारण म्हणजे ‘जंक फूड’ (प्रक्रिया केलेले आणि स्वास्थ्याला अत्यंत हानीकारक असलेले अन्नपदार्थ) खाणे होय. विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी पौष्टिक आहार आवश्यक असून शालेय स्तरावर अशा पदार्थांवर निर्बंध आणल्यास विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच आरोग्यदायी सवयी लागतील. सरकार अन्नसुरक्षेचे नियम अधिक कठोर करण्यासह अन्न पडताळणी प्रयोगशाळा अधिक सक्षम करणार आहे. भेसळयुक्त आणि निकृष्ट अन्नपदार्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विद्यमान प्रयोगशाळांचे आधुनिकीकरण अन् सार्वजनिक-खासगी भागीदारीतून अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. ‘जंक फूड’वरील बंदीचा आदेश लवकरच प्रसारित करण्यात येणार असल्याचेही खादर यांनी स्पष्ट केले.
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल, बेकरी, डेअरी यांचे परवाने निलंबित !
‘राजेश नाईक फाऊंडेशन’कडून फलटण येथे वारकर्यांना राजगिराचे लाडू, तसेच फराळ वाटप !
प्रवाशांना नेहमी स्वच्छ आणि वापरण्यायोग्य सुविधा उपलब्ध करून द्या !
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा