गांजा ओढल्याचा आरोप

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तान क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू महंमद नवाज याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ३ मासांची बंदी घातली आहे. त्याच्या चाचणीत गांजाशी संबंधित प्रतिबंधित पदार्थ आढळून आला.
१. परिषदेच्या माहितीनुसार वर्ष २०२६ मध्ये झालेल्या ‘टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या काळात पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यातील सामन्यानंतर महंमद नवाज याचा नमुना पडताळणीसाठी घेण्यात आला होता. त्यात त्याच्या शरिरात गांजाचा अंश आढळून आला. हा पदार्थ अमली पदार्थांच्या सेवनाच्या श्रेणीत येतो.
२. या संदर्भात परिषदेने स्पष्ट केले की, अन्वेषणात नवाजने मान्य केले की, त्याने गांजाचे सेवन खेळातील कामगिरी सुधारण्यासाठी केले नव्हते, तर स्पर्धेच्या वेळेव्यतिरिक्त केले होते. यामुळे त्याच्यावर कामगिरी वाढवणारे अमली पदार्थ घेतल्याचा गुन्हा सिद्ध झाला नाही आणि याच कारणामुळे नवाजला अल्प शिक्षा झाली. परिषदेने नवाजवर ३ मासांची बंदी घातली; परंतु ही शिक्षा १ मे २०२६ पासून लागू झाली; कारण त्याच दिवसापासून त्याने स्वतःहून तात्पुरते निलंबन स्वीकारले होते. नवाजने व्यसनमुक्ती कार्यक्रम पूर्ण करण्यासही संमती दर्शवली. अनुमाने अडीच मासांचा काळ पूर्ण झाल्यानंतर नवाजवरील तात्पुरते निलंबन हटवण्यात आले.
पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान येथील जनआंदोलनांचे भारताच्या दृष्टीकोनातून सामरिक विश्लेषण
दक्षिण आफ्रिकेत १७ सहस्र हिंदूंनी एकत्र येऊन केले हनुमान चालिसाचे पठण !
इराणच्या आक्रमणात जॉर्डनमधील २ अमेरिकी सैनिक ठार : अमेरिकेचे प्रत्युत्तर !
मी मुसलमान आहे; पण देशात शरीयत लागू करणार नाही ! : Burkina Faso President Ibrahim
पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलकांवरील दडपशाहीविषयी संयुक्त राष्ट्रांकडून चिंता व्यक्त !
Bangladesh Massive Protests : बांगलादेशात हिंदु तरुणाच्या अन्याय अटकेविरुद्ध अल्पसंख्यांकांची निदर्शने