
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात एका हिंदु तरुणाच्या अटकेचा निषेध म्हणून येथे १७ जुलै या दिवशी मोठ्या संख्येने अल्पसंख्यांक समुदायाच्या लोकांनी निदर्शने केली. या निदर्शनाचे आयोजन ‘बांगलादेश हिंदु-बौद्ध-ख्रिश्चन एकता परिषदे’ने ‘नॅशनल प्रेस क्लब’समोर केले होते. हिंदु तरुण हरिदास चंद्र तरणी दास याला आर्थिक गैरव्यवहाराच्या खोट्या प्रकरणात अटक करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. उत्तर बांगलादेशातील गाईबांधा जिल्ह्यातील पलाशबाडी भागात भगवान श्रीरामाची ८१ फूट उंच मूर्ती उभारण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता; म्हणूनच ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
हिंदूंवरील अत्याचार सहन केले जाणार नाहीत !
‘बांगलादेश हिंदु-बौद्ध-ख्रिश्चन एकता परिषदे’चे सरचिटणीस मणींद्र कुमार नाथ यांनी या अटकेचा तीव्र निषेध केला. ते म्हणाले की, सरकारने २-३ दिवसांपूर्वी हरिदास चंद्र तरणी दास यांना अटक करून कारागृहात पाठवले. केवळ भगवान श्रीरामाच्या मूर्ती उभारणीशी जोडलेले असल्यामुळे एखाद्या व्यक्तीला अटक करणे, हे स्वीकारले जाऊ शकत नाही. गेल्या २ वर्षांत बांगलादेशात अल्पसंख्यांक समुदायाच्या लोकांविरोधात सातत्याने हिंसाचार आणि छळ यांच्या घटना घडल्या आहेत. गेल्या एका वर्षात देशभरात३ सहस्र घटना समोर आल्या. यांमध्ये ६६ जणांची हत्या झाली आणि अनेक मंदिरांवर धर्मांधांनी आक्रमणे केली. अशा घटना अत्यंत दुर्दैवी असून त्या सहन केल्या जाऊ शकत नाहीत, असे ते म्हणाले.
सरकारला दिली चेतावणी
एकता परिषदेचे ज्येष्ठ नेते सुब्रत चौधरी यांनी सरकारकडे मागणी केली की, अशा लोकांची ओळख पटवून त्यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी. हरिदास चंद्र तरणी दास यांना कुणाच्या निर्देशानुसार अटक करण्यात आली ? या कारवाईमागे कुणाचा हात आहे ?, हे सरकारने स्पष्ट करावे आणि ते कितीही मोठे अधिकारी असले, तरी त्यांच्यावर कारवाई करावी.
सुटका न झाल्यास मोठ्या आंदोलनाची चेतावणी
हरिदास चंद्र तरणी दास यांची तात्काळ सुटका करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसे न झाल्यास बांगलादेशातील हिंदु, बौद्ध आणि ख्रिश्चन समुदाय एकत्र येऊन देशभरात मोठे आंदोलन चालू करतीलल, अशी चेतावणीही त्यांनी दिली.
भारतानेही व्यक्त केली होती चिंता
यापूर्वी २३ जून या दिवशी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले होते की, हिंदु देवतांच्या मूर्ती आणि धार्मिक प्रतिके यांच्या अपमानाच्या बातम्या चिंताजनक आहेत. बांगलादेश सरकारने कट्टरतावाद्यांवर कठोर कारवाई करावी आणि अल्पसंख्यांक समुदायाची सुरक्षा सुनिश्चित करावी.
संपादकीय : ‘कॉकरोच’वर शाईफेक !
दक्षिण आफ्रिकेत १७ सहस्र हिंदूंनी एकत्र येऊन केले हनुमान चालिसाचे पठण !
इराणच्या आक्रमणात जॉर्डनमधील २ अमेरिकी सैनिक ठार : अमेरिकेचे प्रत्युत्तर !
मी मुसलमान आहे; पण देशात शरीयत लागू करणार नाही ! : Burkina Faso President Ibrahim
पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलकांवरील दडपशाहीविषयी संयुक्त राष्ट्रांकडून चिंता व्यक्त !
Mohammad Nawaz Baned : पाकिस्तानचा क्रिकेटपटू महंमद नवाज याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ३ मासांची बंदी