अटकेतील पी.एफ्.आय.च्या जिहादी कार्यकर्त्यांचे भ्रमणभाष आणि संगणक यांतील माहिती नष्ट करणार्‍या धर्मांधाला अटक !

जळगाव – देशविघातक कारवायांसहित समाजात अशांतता पसरवणे, बाँबस्फोटातील आरोपींशी संबंध असणे, अयोध्येतील श्रीराममंदिराच्या जागी पुन्हा मशीद बांधण्याचा कट रचणे या आरोपांखाली अटकेत असणार्‍या पी.एफ्.आय.च्या जिहादी कार्यकर्त्यांचे भ्रमणभाष आणि संगणक यांतील काही माहिती नष्ट करण्यात आली. (डिलीट करण्यात आली.) ही माहिती आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलेल्या उनैस उमर हयाम पटेल (वय ३२ वर्षे) याला जळगाव येथून अटक करण्यात आली आहे. त्याला नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने १४ दिवसांची एटीएस् कोठडी सुनावली आहे.

संपादकीय भूमिका

  • केवळ पी.एफ्.आय. वर बंदी घालून उपयोग नाही, तर तिचे कार्य विविध माध्यमातून चालू ठेवणार्‍या धर्मांधांना शोधून त्यांच्यावरही कारवाई करणे तितकेच महत्त्वाचे आहे !