मी मुसलमान आहे; पण देशात शरीयत लागू करणार नाही ! : Burkina Faso President Ibrahim

राष्ट्रपती इब्राहिम

बोबोडिउलासो (बुर्किनो फासो) – मी एक मुसलमान आहे आणि माझ्या धर्माच्या परंपरा पाळण्याचे मला स्वातंत्र्य आहे. त्याचप्रमाणे बुर्किना फासोमधील इतर धर्मांच्या लोकांनाही त्यांच्या धर्माचे पालन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मला हे अगदी स्पष्ट करायचे आहे की, या देशात कधीही शरीयत कायदा लागू केला जाणार नाही, अशी घोषणा आफ्रिका खंडातील मुसलमानबहुल देश बुर्किना फासोचे राष्ट्रपती इब्राहिम ट्राओरे यांनी केली. ते पुढे म्हणाले की, त्यांचा देश पूर्णपणे सार्वभौम आणि धर्मनिरपेक्ष राहील. कोणताही धर्म देशापेक्षा मोठा नाही आणि आम्ही शरीयत कायदा स्वीकारणार नाही.

शरीयत शिकण्यासाठी सौदी अरेबियात गेलेल्यांना देशात पुन्हा घेणार नाही !

राष्ट्रपती इब्राहिम ट्राओरे यांनी बुर्किना फासोमधून सौदी अरेबियाला जाऊन शरीयत कायद्याचा अभ्यास करणार्‍यांना पुन्हा देशात घेणार नाही, असेही स्पष्ट केले. ते म्हणाले की, आम्हाला देशात शरीया लागू करायचा नाही. अशा परिस्थितीत जे लोक सौदी अरेबियामध्ये शरिया शिकत आहेत, त्यांची आम्हाला आवश्यकता नाही.त्यांनी आता तेथेच रहावे. त्यांना आमच्या देशात परत येण्याची काहीच आवश्यकता नाही. आमच्या देशाच्या विकासासाठी उपयुक्त ठरणारे तांत्रिक ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करण्याऐवजी त्यांनी स्वतःहून शरीयत कायद्याचा अभ्यास करणे निवडले.
बुर्किना फासोची लोकसंख्या अनुमाने १ कोटी ३८ लाख आहे. वर्ष २०१९ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्येत ६४ टक्के मुसलमान आणि २६ टक्के ख्रिस्ती (रोमन कॅथॉलिक) धर्म मानणारे लोक आहेत. उर्वरित लोक इतर धर्मांचे पालन करतात.

संपादकीय भूमिका

आफ्रिका खंडातील देश बुर्किनो फासोचे राष्ट्रपती इब्राहिम यांची घोषणा