गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा

प्रत्येकी ८ लाख रुपयांचा दंड

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – गोहत्येच्या प्रकरणात येथील न्यायालयाने ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी ८ लाख रुपयांचा दंड ठोठावला.

न्यायालयाने निर्णयात म्हटले आहे की, गोहत्येमुळे बहुसंख्य हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावतात. गोवंश संरक्षण कायद्याचे पालन करणे देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे आणि गोवंश हत्या कायद्याचा भंग आहे. यामुळे धार्मिक सलोखा आणि बंधुभाव प्रभावित होतो; म्हणूनच समाजात कठोर संदेश जाणे आवश्यक आहे.

२४ जानेवारी २०२१ च्या रात्री तितावी भागातील बुडिना खुर्द येथे मुनशाद आणि आस महंमद उपाख्य आशू याच्या घरावर पोलिसांनी धाड घातली होती. येथे ते मुफ्ती अबूजर याच्यासमवेत मिळून गोवंशाची हत्या करत होते.

संपादकीय भूमिका

गोहत्या करणार्‍यांना आता फाशीचीच शिक्षा होणारा कायदा करणे आवश्यकआहे !