आंदोलन करणार्या नेत्यांची अटक आणि इंटरनेट बंदी, यांविषयी विचारला प्रश्न

जिनेव्हा (स्वित्झर्लंड) – पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्थानिकांकडून चालू असलेल्या आंदोलनाविषयी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार कार्यालयाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्त व्होल्कर तुर्क यांनी या भागात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयम बाळगण्याचे आवाहन केले असून आंदोलकांसह सुरक्षा दलांच्या मृत्यूची निष्पक्ष, जलद आणि सर्वसमावेशक चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच संपूर्ण भागात इंटरनेट सेवा पूर्ववत् करण्याचेही आवाहन केले आहे.
तुर्क म्हणाले की, या घटनेचे उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी आंदोलक आणि सुरक्षादल या दोन्ही बाजूंच्या मृत्यूच्या घटनांची पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे. अटक करण्यात आलेल्या ‘जाईंट अवामी ॲक्शन कमिटी’च्या नेत्यांना कायदेशीर साहाय्य उपलब्ध करून दिले पाहिजे आणि त्यांना त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याची संधी दिली पाहिजे. तसेच त्यांच्या निष्पक्ष सुनावणीच्या आणि कायदेशीर प्रक्रियेच्या सर्व अधिकारांची पूर्ण हमी दिली पाहिजे. या भागात तणाव शिगेला पोचला आहे. इंटरनेटवर बंदी घातल्याने लोकांच्या माहिती मिळवण्याच्या, ती प्रसारित करण्याच्या आणि मत मांडण्याच्या अधिकारावर विसंगत प्रभाव पडला आहे. शाश्वत शांतता आणि स्थिरता यांचा मार्ग केवळ संवाद अन् लोकशाही प्रक्रियेतूनच निघू शकतो.
संपादकीय : ‘कॉकरोच’वर शाईफेक !
पाकव्याप्त काश्मीरची भारतात ‘घरवापसी’ करतांना भारताची भूमिका काय असावी ?
पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान येथील जनआंदोलनांचे भारताच्या दृष्टीकोनातून सामरिक विश्लेषण
दक्षिण आफ्रिकेत १७ सहस्र हिंदूंनी एकत्र येऊन केले हनुमान चालिसाचे पठण !
इराणच्या आक्रमणात जॉर्डनमधील २ अमेरिकी सैनिक ठार : अमेरिकेचे प्रत्युत्तर !
मी मुसलमान आहे; पण देशात शरीयत लागू करणार नाही ! : Burkina Faso President Ibrahim