गोव्यात इंदिरानगर, चिंबल येथे ईदच्या निमित्ताने आयोजित मिरवणुकीत धर्मांध मुसलमानांकडून ‘सर तन से जुदा’ची घोषणा !

  • मशिदीतील ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात तक्रार करणार्‍या हिंदूच्या घरासमोर दिल्या घोषणा

  • तक्रार देऊनही अद्याप जुने गोवे पोलिसांकडून कारवाई नाही !

(सर तन से जुदा म्हणजे डोके शरिरापासून वेगळे करणे)

पणजी, १४ ऑक्टोबर (वार्ता.) – इंदिरानगर, चिंबल येथे ९ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ईदच्या निमित्ताने काही मुसलमानांनी एका मिरवणुकीचे आयोजन केले होते. इंदिरानगर येथील नुरानी मशिदीतून ध्वनीक्षेपकावरून मोठ्या आवाजात ५ वेळा अजान दिल्याने ध्वनीप्रदूषण होत असल्याची तक्रार करणारे इंदिरानगर येथील संतोष राजपूत यांच्या घरासमोर जेव्हा मिरवणूक आली, तेव्हा मिरवणुकीत सहभागी झालेल्या धर्मांध मुसलमानांनी ‘गुस्तकी नबी एकही सजा, सर तन से जुदा’ ही घोषणा अनेक वेळा दिली. यामुळे तक्रारदार संतोष राजपूत यांच्या वृद्ध आईसह संपूर्ण कुटुंब घाबरले आणि त्यांनी घराचे दार बंद करून घेतले. संतोष राजपूत यांनी या घटनेविषयी जुने गोवे पोलीस ठाण्यात १२ ऑक्टोबर या दिवशी तक्रार प्रविष्ट केली आहे; मात्र अजूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. (गोव्यातही इतर राज्यांप्रमाणे हिंदूची गळा चिरून हत्या झाल्यावर पोलीस जागे होणार आहेत का ? – संपादक)

संतोष राजपूत तक्रारीत पुढे म्हणतात, ‘‘मिरवणूक माझ्या घरासमोर आल्यावर तिचा वेग मंदावला आणि मिरवणुकीतील एका वाहनात बसलेल्या धर्मांध मुसलमानांनी ‘सर तन से जुदा’ ही घोषणा ५ वेळा दिली. मी मशिदीतील ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केल्याने त्यांनी ही कृती केली. चिंबल येथील परराज्यातील मुसलमानांनी यापूर्वी माझ्यावर २ वेळा आक्रमणे केली आहेत आणि या विरोधात मी अनेक वेळा पोलिसांत तक्रारी प्रविष्ट केल्या आहेत. बंदी घातलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे कार्यकर्ते इंदिरानगर येथे असण्याची दाट शक्यता आहे. संबंधित खुनी घोषणा देणार्‍या धर्मांध मुसलमानांना त्वरित कह्यात घ्यावे. माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या जिवाला धोका संभवतो. गुन्हेगारांना कह्यात घेईपर्यंत मला पोलीस संरक्षण पुरवावे.’’

तक्रारीविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला अधिक माहिती देतांना संतोष राजपूत म्हणाले, ‘‘इंदिरानगर येथे देण्यात आलेल्या हत्येच्या घोषणांच्या विरोधात मी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्याकडे तक्रारी प्रविष्ट केलेल्या आहेत. पोलिसांनी कठोरतेने अन्वेषण केल्यास हत्येच्या घोषणा देणारे त्वरित सापडू शकतात. संबंधित मिरवणूक जर देवासंबंधी असेल, तर त्यामध्ये ‘सर तन से जुदा’ अशी घोषणा का दिली पाहिजे ? धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.’’ (मुसलमानांना धार्मिक सणांच्या वेळी इतरांची हत्या करण्यास शिकवले जाते का ? कारण बहुतांश वेळा शुक्रवारच्या नमाजानंतर, उरुसच्या मिरणुकीनंतर दगडफेक करणे, दंगल घडवणे अशा घटना घडलेल्या यापूर्वी लक्षात आल्या आहेत. – संपादक)

संपादकीय भूमिका

अशा घोषणा देणारे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या बंदी घातलेल्या संघटनेचे सदस्यच असणार, यात शंका नाही. त्यामुळे पोलीस आणि शासन यांनी याची गंभीर नोंद घेऊन राजस्थानमधील कन्हैय्या किंवा विदर्भातील कोल्हे यांच्याप्रमाणे गोव्यातील एखाद्या हिंदूचा गळा धर्मांध मुसलमानाकडून कापला जाण्यापूर्वीच कारवाई करावी, ही अपेक्षा !