
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत उद्योग विभागाची महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. त्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गुंतवणूकक्षम आणि रोजगार निर्मितीची क्षमता असलेल्या क्षेत्रांसाठी सर्वंकष धोरणे आणण्याचे निर्देश दिले. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे (एम्.एस्.एम्.ई.चे) सखोल सर्वेक्षण करून या क्षेत्राची उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करण्यावर भर दिला.
१. एम्.एस्.एम्.ई. हे रोजगार निर्मितीचे सर्वांत मोठे माध्यम असल्याने त्यांच्या उत्थानासाठी नवनवीन तंत्रज्ञान आणणे, उत्पादनक्षमता वाढवणे आणि तज्ञांच्या साहाय्याने धोरणातील त्रुटी दूर करणे याचे आदेश त्यांनी दिले.
२. केमिकल पार्क, कन्व्हेन्शन सेंटर (कार्यक्रम केंद्र) आणि ‘सर्क्युलर इकॉनॉमी’च्या (संसाधनांचा पुन्हा पुन्हा वापर करून न्यूनतम कचरा निर्माण करणारी अर्थव्यवस्था) विकासासाठीही विशेष धोरणे राबवण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या.
३. उद्योगांशी संबंधित सर्व अनुमतींसाठी ‘मैत्री पोर्टल’चा वापर बंधनकारक करण्यात आला असून ‘याद्वारे दिली जाणारी सेवा दर्जेदार आणि जलद असावी’, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय आयोगाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेला नोटीस !
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण !
प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद सुनिश्चित करावी ! – एस्. चोकलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल, बेकरी, डेअरी यांचे परवाने निलंबित !
उल्हासनगर येथील गोठ्यांतून ‘ऑक्सिटोसिन’च्या ६१२ बाटल्या जप्त !
‘राजेश नाईक फाऊंडेशन’कडून फलटण येथे वारकर्यांना राजगिराचे लाडू, तसेच फराळ वाटप !