पंचगंगा प्रदूषणाच्या समस्येवर खासदार धैर्यशील माने यांची प्रोसेसर्स असोसिएशन समवेत बैठक

कारखानदारांनी ‘झिरो डिस्चार्ज’च्या दृष्टीने पाऊल उचलावे, म्हणजे पंचगंगा नदीत प्रोसेस युनिटच्या माध्यमातून जाणारे प्रदूषित पाणी पूर्णपणे थांबेल.

पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी इचलकरंजी नगर परिषदेने आराखडा करावा ! – पालकमंत्री सतेज पाटील

पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठोस कृती न करता किती दिवस बैठकींचा फार्स करणार ?

मेरठच्या ग्रामीण भागातील वाढत्या प्रदूषणामुळे ७ शिक्षकांची स्थानांतराची मागणी

संपूर्ण देशात प्रदूषणात वाढ होत असल्याने स्थानांतर कुठे करायचे ? या वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण न ठेवायला अतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत !

तेरवाड (जिल्हा कोल्हापूर) बंधार्‍यावर सहस्रो मासे मृतावस्थेत आढळल्याने नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांना बांधून ठेवले

इचलकरंजी नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश

दळणवळण बंदी नंतर पुण्यातील अतिसूक्ष्म धूलिकणांत ५ पटीने वाढ

दळणवळण बंदी नंतर पुण्यासह राज्यातील अल्प झालेले सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण परत वाढले आहे. पुणे शहरातील धूलिकणांचे प्रमाण ५ पटीने वाढले आहे.

गोमंतकीय जनतेने भाजपला विकासासाठी मतदान केले असल्याने मोले प्रकल्प राबवणार !

जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला निर्विवाद बहुमत प्राप्त झाले आहे. गोमंतकीय जनतेने भाजपला विकासासाठी मतदान केले आहे. शासन मोले येथील ‘तम्नार पॉवर ट्रान्स्मीशन लाईन’ प्रकल्प राबवणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दिली.

पर्यावरणाचे संरक्षण कवच : अग्निहोत्र

पंचमहायज्ञांतील एक भाग अग्निहोत्र आहे. देवयज्ञ किंवा अग्निहोत्र केल्याने वायू, वृष्टी आणि जल यांची शुद्धी होते, तसेच चांगली वृष्टी होऊन संपूर्ण जगाला सुख प्राप्त होते. कालांतराने यज्ञ हा शब्द अग्निहोत्र यासाठी रूढ झाला. वेद आणि वैदिक संस्कृती इतकाच अग्निहोत्राचा इतिहासही प्राचीन आहे.

पंचगंगा नदी आणि रंकाळा तलाव पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात 

उच्च न्यायालय, केंद्रीय हरीत लवाद यांनी अनेकदा गंभीर ताशेरे ओढूनही औद्योगिक घटकांकडून होणारे नदीचे प्रदूषण थांबवण्यात कोल्हापूर महानगरपालिका आणि इचलकरंजी नगरपालिका यांना यश आलेले नाही.

पर्यावरण कि राजकारण ?

हिंदु धर्मातील ज्या ऋषिमुनींनी सर्वच क्षेत्रांत अमूल्य संशोधन केले, त्यांनी भौतिक विकासाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम लक्षात घेऊनच त्यांनी मनुष्याची जीवनशैली ठरवली होती. त्यामुळे हिंदु धर्मच पर्यावरणप्रिय आहे. त्यानुसार आचरण करून आपण कोरोनावरही मात करू शकलो, तसे प्रदूषणावरही मात करू शकू !

नाशिक महानगरपालिकेच्या विरुद्ध महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार

पालिका प्रशासनाच्या लक्षात का आले नाही ? गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी कांगावा करणारे तथाकथित पर्यावरणवादी आणि अंनिसवाले  आता कुठे आहेत ?