मुंबई – वाढत्या प्रदूषणामुळे आरोग्याच्या विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याने मुंबई आणि देहली या शहरांतील १० पैकी ६ जण स्थलांतरित होण्याच्या विचारात आहेत, अशी माहिती आरोग्यविषयक सेवा पुरणार्या ‘प्रिस्टन केअर’ या आस्थापनाने ४ सहस्र नागरिकांच्या केलेल्या सर्वेक्षणानंतर दिली.
‘प्रदूषणामुळे आम्ही सकाळी फिरायला जाणेही बंद केले आहे’, असे अनेकांनी सांगितले. ९० टक्के लोकांनी त्यांना श्वसनाशी संबंधित समस्या झाल्याचे सांगितले. या वायूप्रदूषणामुळे नागरिकांमध्ये खोकला, घशात खवखवणे, डोळ्यांतून पाणी येणे, जीव घाबरा होणे, दमा, असे अनेकविध रोग बळावल्याचेही या निरीक्षणातून निष्पन्न झाले. वायू गुणवत्ता निर्देशांक घसरल्यावर, विशेषतः हिवाळ्यात हे त्रास अधिक प्रमाणात होतात.
देहलीतील ३० टक्के लोकांनी मुखपट्टी वापरणे चालू केले असून देहली आणि मुंबई येथील २७ टक्के नागरिकांनी ‘एयर प्युरिफायर’ (हवा शुद्धीकरण यंत्र) वापरणे चालू केले आहे. ४३ टक्के नागरिकांनी प्रदूषणामुळे त्यांची प्रतिकारक्षमता न्यून झाल्याचे सांगितले.
संपादकीय भूमिका
|