फटाक्यांसह इतर घटकांचा परिणाम !
नागपूर – आधीच प्रदूषित असलेल्या नागपूर आणि अकोला येथे हिवाळ्यामध्ये प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. ऑक्टोबरपेक्षा नोव्हेंबर मासात दिवाळीचे फटाके आणि इतर अनेक घटक यांमुळे येथील प्रदूषणात वाढ झाली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेली आकडेवारी नागरिकांना धोकादायक आहे.
अकोला येथे सूक्ष्म धूलिकणांचे प्रदूषण अधिक वाढले आहे. नोव्हेंबर मासात अकोला येथे प्रदूषण होते. येथे ०-५० निर्देशांक चांगला मानला जातो. येथे ५१-१०० हा समाधानकारक असा निर्देशांक असलेले, १०१-२०० निर्देशांक असलेले १९ आणि २०१-३०० निर्देशांक असलेले ५ आणि अती वाईट श्रेणीतील प्रदूषणाचे २ दिवस होते. नागपूर येथेही १ मास प्रदूषण होते. १०१-२०० निर्देशांक असलेले ९, तर २०१-३०० निर्देशांक असलेले १९ आणि अती वाईट श्रेणीतील प्रदूषणाचे २ दिवस होते.
पूर्वी हिवाळा आरोग्यासाठी चांगला मानला जात असे; परंतु अलीकडे प्रदूषणामुळे तो धोकादायक ठरत आहे. प्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठी वृक्षसंख्येत वाढ करणे, शहरात सार्वजनिक वाहने, सायकलचा उपयोग वाढवणे, वाहनांच्या संख्येत घट करणे, कचरा न जाळणे, उद्योगांनी प्रदूषण रोखणे, नागरिकांनीही प्रदूषण होऊ नये अशा उपाययोजना केल्या तरच प्रदूषणावर नियंत्रण बसेल.