किन्नीगोळी (कर्नाटक) येथील ‘श्री शक्तीदर्शन योगाश्रमा’च्या वतीने आयोजित केलेले ‘ब्रह्मचैतन्य नृत्य’ (कॉस्मिक डान्स) या विषयावरील शिबीर उत्साहात पार पडले !

मंगळूरू तालुक्यातील किन्नीगोळी येथील ‘श्री शक्तीदर्शन योगाश्रमा’मध्ये प.पू. देवबाबा यांनी ४ ते ८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत ‘ब्रह्मचैतन्य नृत्य’ (कॉस्मिक डान्स) या विषयावर शिबिराचे आयोजन केले होते. त्यामध्ये भारतभरातून ४० जण सहभागी झाले होते…….

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने किन्नीगोळी (कर्नाटक) येथील प.पू. देवबाबांच्या ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’त झालेल्या गायन, वादन आणि नृत्य यांच्या कार्यक्रमांच्या वेळी निसर्गाने विविध माध्यमांतून दिलेला प्रतिसाद

नोव्हेंबर २०१८ मध्ये झालेल्या नृत्याच्या कार्यक्रमाच्या वेळी एक वृक्ष सोडून परिसरातील अन्य वृक्ष प्रतिसाद देत होते.

प.पू. देवबाबा यांच्या किन्नीगोळी (कर्नाटक) येथील ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’त महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधिकांनी गायनसेवा अन् नृत्यसेवा सादर करतांना तेथे उपस्थित असणार्‍या साधकांना आलेल्या अनुभूती !

११.११.२०१८ या दिवशी प.पू. देवबाबा यांच्या किन्नीगोळी (कर्नाटक) येथील ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’त महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या भिलई (छत्तीसगड) येथील कु. अंजली कानस्कर (वय १९ वर्षे) आणि कु. शर्वरी कानस्कर (वय ११ वर्षे) या भगिनींनी कथ्थक, तर रामनाथी आश्रमातील पूर्णवेळ साधिका कु. प्रतीक्षा आचार्य यांनी भरतनाट्यम् नृत्य सादर केले.

किन्निगोळी येथील प.पू. देवबाबा यांच्या आश्रमात दुर्ग, छत्तीसगड येथील कु. अंजली आणि कु. शर्वरी कानस्कर यांनी सादर केलेल्या नृत्याचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

नृत्य करतांना शर्वरी आणि अंजली विशिष्ट गतीने आपले पाय भूमीवर सतत आपटत होत्या. त्याच्या जोडीला त्यांच्या पायातील घुंगरांचा नाद होत होता. त्या वेळी वातावरणात मारक शक्ती पुष्कळ प्रमाणात पसरू लागली.

प.पू. देवबाबा यांच्या किन्नीगोळी (कर्नाटक) येथील ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’त महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधिकांनी गायनसेवा अन् नृत्यसेवा सादर करतांना तेथे उपस्थित असणार्‍या साधकांना आलेल्या अनुभूती !

साधिकांनी नृत्यातील ‘वंदना’ हा प्रकार सादर करतांना त्या ठिकाणी ‘त्रिदेव उपस्थित आहेत’, असे जाणवणे .

प.पू. देवबाबा यांच्या किन्नीगोळी (कर्नाटक) येथील ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’त गायनसेवा आणि नृत्यसेवा सादर करणार्‍या अन् तेथे उपस्थित असणार्‍या महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधिकांना आलेल्या अनुभूती !

नृत्य चालू असतांनाच वीजपुरवठा खंडित झाला. त्या वेळी नृत्य करतांना मी देहभान विसरले. ‘मी नृत्य करत नसून माझ्या ठिकाणी भगवान शिव नृत्य करत आहे. शिवाची शक्ती जणू नृत्य करत आहे’, असे मला जाणवले.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधिकांनी ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’त नृत्य आणि गायन सेवा सादर केल्यावर प.पू. देवबाबांनी काढलेले गौरवोद्गार, निसर्गात झालेले चैतन्यमय पालट अन् प.पू. देवबाबांच्या भक्तांना आलेल्या अनुभूती !

११.११.२०१८ या दिवशी प.पू. देवबाबा यांच्या किन्नीगोळी (कर्नाटक) येथील ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’त महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या भिलई (छत्तीसगड) येथील अनुक्रमे ५५ टक्के आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. अंजली आणि कु. शर्वरी या कानस्कर भगिनींनी कथ्थक नृत्य सादर केले.

डोंबिवली येथील ‘विशाखा नृत्यालया’चा २५ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा !

५ ऑक्टोबर २०१८ या दिवशी कल्याण, ठाणे येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात डोंबिवली येथील ‘विशाखा नृत्यालया’चा २५ वा वर्धापनदिन पार पडला.

कु. अंजली कानस्कर हिने सादर केलेल्या ‘तराना’ नृत्यप्रयोगाचा वाईट शक्तींचा तीव्र त्रास असणार्‍या साधकांवर झालेला परिणाम आणि कु. अंजलीची वैशिष्ट्ये

अंजलीने नृत्याला आरंभ केल्यावर तिच्या हालचालींमधून आणि ती करत असलेल्या नृत्यातील मुद्रांमधून सात्त्विक स्पंदनांचे प्रक्षेपण होऊ लागले. तिने नृत्यास आरंभ केल्यावर ‘सर्वत्र आनंदाची कारंजी उडत आहेत’, असे दृश्य दिसले आणि मन हलके झाले.

कु. शर्वरी कानस्कर हिने सादर केलेल्या नृत्याचा आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकांवर झालेला परिणाम

नृत्य करतांना शर्वरीच्या भोवती पांढर्‍या आणि लाल रंगांचे दैवी कण निर्माण होत होते. शर्वरीच्या मनात जेव्हा देवाचे स्मरण चालू होते, तेव्हा तिच्या भावामुळे वातावरणात सूक्ष्म निळ्या रंगाचे दैवी कण निर्माण होत होते. या दैवी कणांमुळे शर्वरीला ईश्‍वरी ऊर्जा प्राप्त होऊन तिचे वाईट शक्तींपासून रक्षण होत होते.


Multi Language |Offline reading | PDF