‘८.१.२०२५ या दिवशी ‘सुरभि एन्सेम्बल’ या वाद्यवृंद कलाकारांचा समूह आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय यांच्या वतीने ‘स्पॅनिश फ्लॅमिंको (Spanish Flaminco)’ या नृत्य प्रकाराचे आध्यात्मिक संशोधन करण्यात आले. या संशोधन अंतर्गत दोन प्रयोग घेण्यात आले पहिल्या प्रयोगात नर्तकी श्रीमती लेतीशिया आरावेना हिने मनात विविध प्रकारच्या भावना जागृत ठेवून नृत्य प्रस्तुत केले, तर दूसर्या प्रयोगात नर्तकीने मनात ईश्वराप्रती भाव ठेवून नृत्य प्रस्तुत केले. हे दोन्ही नृत्य पहातांना सूक्ष्म स्तरावर जाणवलेले अंतर आणि अन्य सूत्र येथे देत आहे.
(भाग १)
१. नर्तकीने मनात भावना ठेवून नृत्य प्रस्तुत करणे आणि ईश्वराप्रतीचा भाव ठेवून नृत्य प्रस्तुत करणे यांतील सूक्ष्म स्तरीय भेद
१ अ. नृत्यातील त्रिगुणांचे प्रमाण
१ आ. नर्तकीवर झालेले सूक्ष्मस्तरीय परिणाम
१ इ. नर्तकीच्या सोबत वाद्यावर संगत करणारे अन्य वाद्यवृंदांवर होणारे परिणाम
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक