नवरात्रोत्सवाची सिद्धता पूर्ण : प्रतिघंट्याला ७०० भाविकांना श्री महालक्ष्मीदेवीचे ‘ई-दर्शन पास’द्वारे दर्शन होणार !

साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील नवरात्रोत्सवाची सिद्धता पूर्ण झाली आहे. संपूर्ण मंदिरावर विद्युत् रोषणाई करण्यात आली आहे.

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ‘बालसंस्कार डॉट कॉम’ संकेतस्थळावरून घेण्यात येत आहे ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा !

‘हिंदु जनजागृती समिती सातत्याने प्रत्येक सणाच्या निमित्ताने अशा प्रकारे प्रश्नमंजुषा उपलब्ध करून देत असून त्यामुळे त्या सणांच्या वेळी धार्मिक कृतींमागील शास्त्र समजण्यास साहाय्य होते’, अशी प्रतिक्रिया जिज्ञासूंची आहे. 

कोरोनाविषयक नियम पाळून नवरात्रोत्सव साजरा करण्याचे पोलिसांचे आवाहन

नवरात्रोत्सव आणि दसरा हे सण शांततेत आणि सुरळीत साजरे व्हावेत, यासाठी पोलीस प्रशासनाने नियोजन केले आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांत नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठका घेण्यात आल्या आहेत.

महिलांची नवदुर्गा स्वरूपातील विविध रूपे

जन्म घेणारी कन्या ही शैलपुत्रीस्वरूप असते. कौमार्य अवस्थेपर्यंत ब्रह्मचारिणीचे रूप आहे. विवाहापूर्वीपर्यंत चंद्रसमान निर्मळ असल्यामुळे ती चंद्रघण्टेसमान असते.

घटस्थापनेच्यावेळी डी.जे. वर लावलेल्या रिमिक्स गाण्यांवर गरबा नृत्य करताना केलेले सूक्ष्म परीक्षण !

डी.जे. वर लावलेली रिमिक्स गाणी तामसिक असतात. त्यामुळे या गाण्यांवर नृत्य केल्यामुळे मनाची वृत्ती अत्यंत बहिर्मुख होते आणि देवीविषयीचा भाव जागृत होत नाही.

७ ऑक्टोबरपासून कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरात ‘ई-दर्शन पास’ असलेल्यांनाच दर्शन मिळणार !

नवरात्रीत पहिल्या दिवशी म्हणजे ७ ऑक्टोबरपासून साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेले श्री महालक्ष्मी मंदिर भाविकांसाठी खुले होत आहे. श्री महालक्ष्मी मंदिरात केवळ ‘ई-दर्शन पास’ असलेल्यांना दर्शन मिळणार आहे.

नवरात्रोत्सवासाठी राज्य सरकारची नियमावली घोषित !

राज्य सरकारने मागील वर्षाप्रमाणे या वर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरबा आणि दांडिया यांच्या आयोजनावर बंदी घातली आहे. तसेच देवीच्या मूर्तीची उंची आणि मंडपाचा आकार यांवरही निर्बंध घातले आहेत.

पुणे येथील चतुःशृंगी मंदिरात कोरोनाविषयक नियमांचे पालन करून घटस्थापनेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ

७ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ८ वाजता अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करण्यात येणार आहेत. सकाळी साडेनऊ वाजता घटस्थापना करण्यात येणार असून, प्रतिदिन सकाळी १० आणि रात्री ८ वाजता महाआरती करण्यात येणार आहे.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

आपतकालीन स्थितीमध्ये नवरात्रोत्सव कसा साजरा करावा ?

नाशिक येथे नवरात्रोत्सवात वणीचे सप्तश्रृंगी मंदिर २४ घंटे चालू रहाणार !

‘जिल्ह्यात नवरात्रोत्सवाची सिद्धता मोठ्या उत्साहात चालू झाली आहे. या काळात वणी येथील सप्तश्रृंगी मंदिरही खुले रहाणार आहे; मात्र भाविकांना पासविना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. ६५ वर्षांवरील आणि आजारी व्यक्ती, गर्भवती महिला अन् लहान मुले यांनी या काळात गडावर येऊ नये’