१. जन्म घेणारी कन्या ही शैलपुत्रीस्वरूप असते.
२. कौमार्य अवस्थेपर्यंत ब्रह्मचारिणीचे रूप आहे.
३. विवाहापूर्वीपर्यंत चंद्रसमान निर्मळ असल्यामुळे ती चंद्रघण्टेसमान असते.
४. अपत्याला जन्म दिल्यानंतर तीच स्त्री स्कंदमाता होते.
५. जिवाला जन्म देण्यासाठी गर्भधारणा केल्यानंतर ती कुष्माण्डास्वरूप असते.
६. संयम आणि साधना यांना धारण करणारी स्त्री ही कात्यायनीरूपी असते.
७. आपल्या संकल्पाने पतीच्या अकाली मृत्यूलाही जिंकणारी ती कालरात्री आहे.
८. स्वतःचे कुटुंब आणि संसार, हेच तिचे जग आहे. उपकार केल्यामुळे ती महागौरी होते.
९. स्वर्गाकडे प्रयाण करण्यापूर्वी स्वतःच्या अपत्याला सिद्धी आणि सुखसंपदा यांसाठी आशीर्वाद देतांना ती सिद्धिदात्री होते.
(साभार : नवरात्री विशेषांक ‘संस्कृति संचार’, ऑक्टोबर २०१६)