भूकंपामुळे तुर्कीयेच्या अर्थव्यवस्थेला फटका
आर्थिक संकटात असलेल्या तुर्कीयेमध्ये आलेल्या भूकंपामुळे तेथील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. तेथील चलन ‘लिरा’च्या मूल्यामध्ये घसरण झाली आहे. अमेरिकेतील भूगर्भशास्त्रज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार तुर्कीये आणि सीरिया येथे झालेल्या भूकंपामुळे १ अब्ज डॉलरची (सुमारे ८ सहस्र कोटी रुपयांची) हानी झाल्याचा अंदाज आहे.