तुर्कीयेमध्ये आणीबाणी घोषित
अंकारा (तुर्कस्थान) – तुर्कीयेमध्ये झालेल्या भूकंपामध्ये आतापर्यंत तुर्कीये आणि सीरिया या देशांत ५ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १५ सहस्रांहून अधिक लोक घायाळ झाले आहेत. गेल्या २४ घंट्यांत तुर्कीयेमध्ये ४ वेळा भूकंपाचे मोठे धक्के जाणवले. यात आतापर्यंत १० शहरांतील २ सहस्रांहून अधिक इमारती कोसळल्या आहेत. सीरियामध्ये कमीत कमी ७८३ जण ठार झाले आहेत, तर ६३९ जण घायाळ झाले आहेत. तुर्कीयेने देशात आणीबाणी घोषित केली आहे.
Turkey earthquake LATEST: Third quake hits close to surface as death toll surpasses 5,000 https://t.co/5wuVh7ZVAL
— Daily Mail Online (@MailOnline) February 7, 2023
भारताकडून साहाय्य
भारताने तुर्कीयेला सर्व प्रकारचे साहाय्य करण्याचे आश्वासन दिले आहे. भारताच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या २ तुकड्या तुर्कीयेला पोचल्या आहेत. त्यांच्या समवेत एक श्वान पथकही आहे.