पिकांची हानी होणार !
संभाजीनगर – गेल्या काही दिवसांपासून शेतकरी वेगवेगळ्या संकटांमुळे मेटाकुटीला आलेला असतांनाच २४ जानेवारी या दिवशी रात्री ८ वाजता शहरासह जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार पाऊस पडला. त्यामुळे शेतकर्यांच्या शेतीची हानी होणार आहे. दिवसभर शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते.
जिल्ह्यातील गंगापूर, दहेगाव, शेंदूरवाडा, तर पैठण तालुक्यातील बिडकीन, लोहगाव, सोमपुरी आणि वाळूज या परिसरात काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दौलताबाद परिसरातही रिमझिम पाऊस झाल्याने अनेक परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. जिल्ह्यासह अनेक ठिकाणी रब्बीचा हंगामा चालू आहे. त्यातच पाऊस चालू झाल्याने रब्बी हंगामाला जोराचा फटका बसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.