चारधाम यात्रेसाठी बांधण्यात येणार्‍या रस्त्याच्या संदर्भातील तज्ञांचा अहवाल दडपण्यात आला ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचा आरोप

नवी देहली – उत्तराखंडातील चारधाम रस्त्याच्या बांधकामाच्या संदर्भात तज्ञांचा अहवाल दडपून टाकणे, म्हणजे भगवान महादेवाचा राग जनतेपासून लपवणे होय. मंदिराच्या ठिकाणांना जोडणारा महामार्ग बांधून कोणतीही असुर शक्ती जनतेला देवाने दिलेली देणगी नाकारू शकत नाही. रामसेतूच्या संदर्भातही तसेच आहे.

ही श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही, अशी टीका भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी उत्तराखंडातील भूस्खलनावरून केली.

जोशीमठ गावामध्ये झालेल्या भूस्खलनामागे चारधाम यात्रेसाठी बांधण्यात येणार्‍या रस्त्याचे कामही कारणीभूत असल्याचा तज्ञांचे, तसेच स्थानिकांचे मत आहे. तज्ञांनी याविषयीचा अहवालही सादर केला असून तो दडपण्यात आला आहे, असा आरोपही डॉ. स्वामी यांनी केला आहे.

Link :Sanatan Prabhat

Dr. Subramanian Swamy challenges Govt. take-over of Chardham and 51 temples, in the Supreme Court now

https://sanatanprabhat.org/english/28452.html