रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस : चिपळूणसह जिल्ह्यातील पूरस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा 

वाशिष्ठीचे पाणी वाढले असल्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना म्हणून आवश्यक त्या ठिकाणी नागरिकांचे तातडीने स्थलांतर करावे, तसेच पुरामुळे बाधित नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तातडीने पुरवठा करण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या.

नैसर्गिक आपत्तीमुळे ३ मासांत महाराष्‍ट्रात ९५ जण मृत्‍यूमुखी !

नैसर्गिक आपत्तीमुळे मार्च ते मे २०२३ या कालावधीत महाराष्‍ट्रातील ९५ जण मृत्‍यूमुखी पडले आहेत, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी १८ जुलै या दिवशी विधानसभेत दिली.

गोवा : कला अकादमीतील रंगमंचाचे छत कोसळल्यावरून गोवा विधानसभेत गदारोळ !

कला अकादमीच्या खुल्या प्रेक्षागृहाच्या रंगमंचाचे छत कोसळल्याच्या प्रकरणाचे पडसाद गोवा विधानसभेच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजावर उमटले !

गोवा येथील कला अकादमीच्या खुल्या प्रेक्षागृहाच्या रंगमंचाचे छत कोसळले : नागरिकांमध्ये संताप

निविदा न काढता नूतनीकरणाचे काम हाती घेतल्याने हे काम प्रारंभापासूनच वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; परंतु यात लाखो रुपयांची हानी झाली आहे. व्यासपिठावरील अनेक पुरातन आणि दर्जेदार प्राचीन साहित्याची मोठी हानी झाली आहे.

राज्यातील आपत्तींचे व्यवस्थापन पहाणारा मंत्रालयातील विभागच आपत्तीमध्ये !

मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षामधीलही अनेक पदे रिक्त आहेत. मंत्रालयीन नियंत्रण कक्ष आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांतील रिक्त पदे भरण्याची मागणी या विभागांकडून करण्यात आली आहे; मात्र राज्य सरकारकडून त्याची पूर्तता करण्यात आलेली नाही.

वर्ष २०२५ मध्ये येणार्‍या सौर वादळामुळे जगभरातील इंटरनेटची संपूर्ण यंत्रणाच नष्ट होण्याची शक्यता !

या प्रकाराला ‘इंटरनेट अ‍ॅपोकॅलिप्स’ अशा संज्ञेने संबोधिले गेले आहे.

राजधानी संकटात !

‘निसर्गाने साथ द्यावी’, असे वाटत असेल, तर धर्माचरणाचा मार्ग अवलंबण्यातच हित आहे, हे मनुष्याने लक्षात घ्यावे !

१७-१८ जुलैला रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट  

मुंबईसह किनारपट्टीच्या अनेक भागांत जोरदार पाऊस चालू झाला आहे. खेड येथील जगबुडी नदीची पातळी वाढली असून तिने आता धोक्याची पातळीही ओलांडली असल्याचे वृत्त आहे.

यमुनेच्या पाण्यामुळे राष्ट्रीय राजधानीत हाहा:कार !

देहलीतील सखल भाग पाण्याखाली गेला असून लाल किल्ल्याच्या भागातही पाणी घुसले आहे. यासह अनेक ठिकाणी रस्त्यावरील ट्रक आणि बस जवळपास पूर्णच बुडाल्या आहेत.

महाराष्‍ट्राला सर्वाधिक आपत्ती निवारण निधी !

ओला दुष्‍काळ, पूरग्रस्‍त, पावसाळ्‍यातील हानी आदी आपत्तींसाठी केंद्र शासनाकडून प्रत्‍येक राज्‍याला आपत्ती निवारण निधी दिला जातो. यंदा महाराष्‍ट्राला सर्वाधिक १४२०.८० कोटी रुपयांचा आपत्ती निवारण निधी मिळाला आहे.