तैवानमध्ये ‘कोइनू’ नावाच्या चक्रीवादळामुळे हाहा:कार !
चक्रीवादळामुळे अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून वीजपुरवठा खंडित झाला आहे.
चक्रीवादळामुळे अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून वीजपुरवठा खंडित झाला आहे.
पूरपरिस्थिती कायम !
७ सहस्र लोक अडकले, साहाय्यता कार्य चालू !
राजधानी देहलीसह उत्तरप्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये ३ ऑक्टोबर या दिवशी भूकंपाचे धक्के जाणवले. देहली-एन्.सी.आर्. या भागात दुपारी २ वाजून ५३ मिनिटांनी झालेल्या भूकंपाची रिश्टर स्केलवर ४.६ इतकी तीव्रता नोंदवली.
गोवा राज्यात आणि शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात संततधार पाऊस सलग दुसर्या दिवशीही चालूच होता. जोरदार वारे आणि पाऊस यांच्यामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आणि वीजपुरवठा खंडित झाला. संक्षिप्त वृत्तांत देत आहोत.
गोव्यात सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने अतीवृष्टीची चेतावणी दिल्याने प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली आहे. कुशावती, म्हादई आदी नद्या दुथडी भरून वहात आहेत.
अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार घडल्याने संबंधित भागातील वीजपुरवठा खंडित ! दक्षिण कोकण आणि गोव्याची किनारपट्टी या भागांत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने १ ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टीची चेतावणी हवामान विभागाने दिली आहे.
‘अशा दुर्घटना घडू नयेत, यासाठी शहर आणि परिसरातील धोकादायक स्थितींविषयी प्रशासनाला वेळोवेळी जाणीव करून दिली जाते; मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करते.’’
असे असेल, तर विभागातील संबंधित उत्तरदायी अधिकार्यांना बडतर्फच करायला हवे !
‘निसर्गाचा कोप म्हणायचा ? कि नियोजनशून्यतेचा शाप ?’ नदीपट्ट्यांतील बांधकामांना बंदी, नैसर्गिक नाले चालू करणे आणि अनधिकृत बांधकामे अन् अतिक्रमणे कायमची हटवल्यानंतरच पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीतून नागरिकांची सुटका होणार आहे, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने शहरातील अनेक भागांतील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. बसस्थानकामधील बस पाण्यात बुडल्या.