मोरोक्कोमधील भूकंपामध्ये ८२० हून अधिक जणांचा मृत्यू !

मोरोक्कोमध्ये ६.८ रिक्टर स्केलचा भूकंप !

रबात (मोरक्को) – आफ्रिका खंडातील मोरोक्को देशात ९ सप्टेंबरच्या पहाटे ६.८ रिक्टर स्केलचा भूकंप होऊन यात ८२० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच १५३ जण घायाळ झाले आहेत.

या भूकंपात अनेक इमारती कोसळल्या आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू मोरोक्कोच्या मारकेश शहरापासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर होता.

पंतप्रधान मोदी यांच्याकडून शोक व्यक्त

मोरोक्कोतील भूकंपाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून म्हटले की, मोरोक्कोतील भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. हे वृत्त ऐकून दु:ख झाले आहे. या दु:खद प्रसंगी माझ्या संवेदना मोरोक्कोतील लोकांसमवेत आहेत.

या कठीण काळात मोरोक्काला सर्वतोपरी साहाय्य करण्यासाठी भारत सिद्ध आहे.