१०० वर्षांच्या इतिहासातील हे सर्वांत भीषण चक्रीवादळ
वॉशिंग्टन – अमेरिकेत आलेल्या ‘इडालिया’ नावाच्या चक्रीवादळाने हाहाःकार उडवला आहे. या चक्रीवादळामुळे अमेरिकेतील ४ राज्यांमध्ये मोठा विध्वंस झाला आहे. इडालियाच्या कहरामुळे फ्लोरिडा प्रांतात दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. फ्लोरिडानंतर हे वादळ जॉर्जिया, नॉर्थ कॅरोलिना आणि साउथ कॅरोलिनाकडे सरकले. जॉर्जिया आणि फ्लोरिडा येथील अनुमाने साडेचार लाख लोकांच्या घरातील वीज गेली.
साइक्लोन ‘इडालिया’ से अमेरिका के कई राज्यों में तबाही, 900 उड़ानें निरस्त, 100 का सबसे खतरनाक तूफान#IdaliaCyclone #America #FlightsCancelledhttps://t.co/GcVTG0mt3g
— India TV (@indiatvnews) September 1, 2023
‘इडालिया’ चक्रीवादळामुळे विमानांची ९०० उड्डाणे रहित झाली. फ्लोरिडाच्या १०० वर्षांच्या इतिहासातील हे सर्वांत भीषण चक्रीवादळ होते. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर चारही राज्यांमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. यापूर्वी वर्ष १८९६ मध्ये फ्लोरिडाला ‘सीडर कीज’ नावाच्या अतिशय शक्तीशाली आणि विनाशकारी चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. यामध्ये ७० जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर वर्ष २०१६ मध्ये ‘हरमाईन’ नावाच्या चक्रीवादळाचा तडाखा बसला होता.