नाशिक – सप्टेंबर २०२३ मध्ये धार्मिक आणि जातीय तणाव वाढण्याची शक्यता असून मंदिर आणि मशीद किंवा हिंदु-मुसलमान या वादातून हिंसा, जाळपोळ घडवण्याचा प्रयत्न या काळात संभावतो, तसेच दक्षिण-पूर्व भारतात मोठा पाऊसही पडू शकतो. सांगली, कोल्हापूर यांसह कर्नाटक आणि तमिळनाडू येथे नैसर्गिक आपत्ती, पूर, भूकंप, स्फोटक घटनाही या काळात घडू शकतात. राजकीय आणि सामाजिक दृष्टीने हा काळ ताणतणावाचा राहील, असे भाष्य येथील प्रसिद्धी ज्योतिषी श्री. सिद्धेश्वर मारटकर यांनी सप्टेंबर मासातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींविषयी केले आहे.