गोव्यातून भाग्यनगरला अमली पदार्थाची वाहतूक करणारे जाळे उद्ध्वस्त : तेलंगाणा पोलिसांची कारवाई

लिंगमपल्ली अनुराधा हिने ‘ती गोव्यातून अमली पदार्थ आणत होती’, याची स्वीकृती पोलिसांना दिली आहे. संशयित लिंगमपल्ली अनुराधा आणि तिचे दोन मित्र भाग्यनगर येथे जेवणाचा डबा पुरवण्याचे केंद्र चालवत होते.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात महिला कर्मचार्‍याशी गैरवर्तन केल्याच्या प्रकरणी कर्मचारी निलंबित

गेल्या ७५ वर्षांत शालेय अभ्यासक्रमातून साधनेद्वारे नैतिकता न रुजवल्याचा परिणाम ! गोव्यासारख्या छोट्या राज्यात शिक्षक, पोलीस आणि आता रुग्णालयातील कर्मचारी यांनी महिलांचा विनयभंग केल्याचे उघडकीस आले असून हे प्रकार वाढल्यास नवल नाही !

प्राचीन तंत्रज्ञानाचा वापर करून गोव्यात जहाजबांधणी होणार !

‘‘भारताला पुष्कळ समृद्ध आणि प्राचीन सागरी परंपरा लाभलेली आहे आणि यामुळे प्राचीन तंत्राचा वापर करून जहाज बांधण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे सदस्य संजीव सान्याल यांच्या कल्पनेतून हा उपक्रम साकारला जात आहे.’’

गोवा : सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या ३० हिंदु विद्यार्थ्यांना मशिदीत पाठवून इस्लामनुसार कृती करायला लावली !

दाबोळी येथील केशव स्मृती विद्यालयाचे असेच प्रकरण ताजे असतांनाच आता हा ही एक प्रकार ! गोवा सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करणे आवश्यक !

(म्‍हणे) ‘निवडणुकीसाठी राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ आणि भाजप यांच्‍याकडून नरसंहाराची शक्‍यता !’ – प्रकाश आंबेडकर, अध्‍यक्ष, वंचित बहुजन आघाडी

देशात दंगली घडवणार्‍यांविषयी, तसेच आतंकवादी कारवाया करणार्‍यांविषयी चकार शब्‍दही न काढता हिंदूंनाच हिंसक ठरवणे, हा हिंदुद्वेष !

ज्‍योतिषाला विचारून करण्‍यात आली होती भारतीय फुटबॉल संघाची निवड !

भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक इगोर स्‍टिमॅक यांनी गेल्‍या वर्षी अनेक सामन्‍यांमध्‍ये संघातील खेळाडूंची निवड करण्‍यासाठी ज्‍योतिषी भूपेश शर्मा यांचे साहाय्‍य घेतल्‍याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे.

पाकव्‍याप्‍त काश्‍मीर आपोआप भारतात विलीन होईल ! – निवृत्त जनरल व्‍ही.के. सिंह

पाकव्‍याप्‍त काश्‍मीर आपोआप भारतात विलीन होईल. यासाठी आपल्‍याला थोडी प्रतीक्षा करावी लागेल, असे केंद्रीय मंत्री आणि माजी सैन्‍यप्रमुख जनरल व्‍ही.के. सिंह यांनी सांगितले.

डिझेल वाहनांवर अतिरिक्‍त १० टक्‍के ‘जी.एस्.टी.’ कर लावण्‍याचा प्रस्‍ताव नाही ! – नितीन गडकरी

डिझेल वाहनांवर अतिरिक्‍त १० टक्‍के ‘जी.एस्.टी.’ कर लावण्‍याचा कोणताही प्रस्‍ताव नाही, असा खुलासा केंद्रीय रस्‍ते वाहतूक महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी सांगितले.

उत्तराखंडमधील मदरशांत संस्‍कृत भाषा शिकवणार ! – वक्‍फ बोर्डाचा निर्णय

उत्तराखंडमधील मदरशांमध्‍ये ‘राष्‍ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद’ अर्थात् ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्‍या अंतर्गत येणारे विषय शिकवले जाणार आहेत. यात संस्‍कृतचाही समावेश आहे.

मंदिरांचे सरकारीकरण करून ती चालवणारे तमिळनाडू सरकार ‘सनातन धर्मा’ची मंदिरेही नष्‍ट करणार का ? – गायत्री एन्., संस्‍थापिका, ‘भारत व्‍हॉईस’

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘सनातन धर्म डेंग्‍यू, मलेरिया यांच्‍यासारखा नष्‍ट होणार का ?’