हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने सोजत (राजस्‍थान) येथे विविध शाळा आणि गणेशोत्‍सव मंडळे यांमध्‍ये प्रबोधन !

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने सोजत भागातील स्‍थानिक शाळा आणि गणेश मंडळे यांच्‍यामध्‍ये ‘आदर्श गणेशोत्‍सव साजरा कसा करावा ?’, याविषयी प्रबोधन करण्‍यात आले.

वाघनखे भावी पिढीला शिवप्रतापाची प्रेरणा देतील ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे ब्रिटनमधून भारतात आणण्‍याच्‍या सामंजस्‍य करारावर ३ ऑक्‍टोबर या दिवशी लंडन येथील ‘व्‍हिक्‍टोरिया अँड अलबर्ट म्‍युझियम’मध्‍ये स्‍वाक्षरी झाली.

आपचे खासदार संजय सिंह यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून अटक  

अबकारी धोरणाच्या संदर्भात ही धाड घालण्यात आली होती. अबकारी धोरण प्रकरणाच्या आरोपपत्रात संजय सिंह यांचे नाव आहे.

आसाममध्ये बालविवाहाच्या विरोधात कारवाई चालू : १ सहस्र ३९ लोकांना अटक !

बालविवाहासारख्या सामाजिक अपप्रकारांच्या विरोधात आसाम शासनाप्रमाणेच अन्य सरकारांनीही प्रयत्न केले पाहिजेत !

(म्हणे) ‘कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी अल्पसंख्यांकांना १० सहस्र कोटी रुपयांपर्यंत अनुदान देणार !’ – सिद्धरामय्या

बहुसंख्य हिंदूंनी कर रूपाने भरलेला पैसा अन्य धर्मियांवर केवळ मतांच्या लांगूलचालनासाठी त्यांच्यावर उधळणार्‍या काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना हे मान्य आहे का ?

भ्रमणभाषांचे उत्पादन करून त्यांची निर्यात करणारा चीननंतर जगातील दुसरा देश बनला भारत !

येनकेन प्रकारेण (कोणत्याही प्रकारे) भारताचे अहित चिंतणार्‍या कावेबाज चीनला शह देण्यासाठी भारतानेही पावले उचलावीत !

उत्तरप्रदेशात मदरशांमध्ये विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धीमत्तेचे शिक्षण देणार !

मदरशांमध्ये राष्ट्रघातकी शिक्षण देऊन मुलांचा बुद्धीभेद केला जात असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. असे असतांना त्यांना कुत्रिम बुद्धीमत्तेचे शिक्षण दिल्यास त्याचा वापर राष्ट्रविघातक आणि देशविघातक कारवायांसाठी झाला, तर त्यात आश्‍चर्य ते काय ?

३ मुलींची हत्या करणार्‍या बिहारमधील जोडप्याला अटक !

बिहारमधील कटिहार येथील एक जोडपे त्यांच्या ४ मुली आणि १ मुलगा यांसह कानपूर, जालंधर येथे रहात होते. या जोडप्याने स्वत:च्या ३ मोठ्या मुलींना विष मिसळलेले दूध प्यायला दिले. तिन्ही मुलींचा तडफडून मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आई-वडिलांना अटक केली आहे.

आसामच्या ५ आदिवासी मुसलमान समाजाचे सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण होणार !

यामुळे या समाजाच्या विकासासाठी पावले उचलता येतील, असे आसाम सरकारकडून अधिकृतरित्या सांगण्यात आले आहे.

‘ईडी’ची कारवाई सूड घेण्याच्या भूमिकेतील नसावी ! – सर्वोच्च न्यायालय

अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) पारदर्शक, निष्पक्षता आणि सत्यतेचे मूलभूत मापदंड यांचे पालन केले पाहिजे. ‘ईडी’ची कारवाई सूड घेण्याच्या भूमिकेतून नसावी. तसेच अटकेचे कारण दाखवण्यासाठी केवळ कोठडीचा आदेश देणे पुरेसे नाही.