आसाममध्ये बालविवाहाच्या विरोधात कारवाई चालू : १ सहस्र ३९ लोकांना अटक !

बालविवाहासारख्या सामाजिक अपप्रकारांच्या विरोधात आसाम शासनाप्रमाणेच अन्य सरकारांनीही प्रयत्न केले पाहिजेत !

(म्हणे) ‘कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी अल्पसंख्यांकांना १० सहस्र कोटी रुपयांपर्यंत अनुदान देणार !’ – सिद्धरामय्या

बहुसंख्य हिंदूंनी कर रूपाने भरलेला पैसा अन्य धर्मियांवर केवळ मतांच्या लांगूलचालनासाठी त्यांच्यावर उधळणार्‍या काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना हे मान्य आहे का ?

भ्रमणभाषांचे उत्पादन करून त्यांची निर्यात करणारा चीननंतर जगातील दुसरा देश बनला भारत !

येनकेन प्रकारेण (कोणत्याही प्रकारे) भारताचे अहित चिंतणार्‍या कावेबाज चीनला शह देण्यासाठी भारतानेही पावले उचलावीत !

उत्तरप्रदेशात मदरशांमध्ये विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धीमत्तेचे शिक्षण देणार !

मदरशांमध्ये राष्ट्रघातकी शिक्षण देऊन मुलांचा बुद्धीभेद केला जात असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. असे असतांना त्यांना कुत्रिम बुद्धीमत्तेचे शिक्षण दिल्यास त्याचा वापर राष्ट्रविघातक आणि देशविघातक कारवायांसाठी झाला, तर त्यात आश्‍चर्य ते काय ?

३ मुलींची हत्या करणार्‍या बिहारमधील जोडप्याला अटक !

बिहारमधील कटिहार येथील एक जोडपे त्यांच्या ४ मुली आणि १ मुलगा यांसह कानपूर, जालंधर येथे रहात होते. या जोडप्याने स्वत:च्या ३ मोठ्या मुलींना विष मिसळलेले दूध प्यायला दिले. तिन्ही मुलींचा तडफडून मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आई-वडिलांना अटक केली आहे.

आसामच्या ५ आदिवासी मुसलमान समाजाचे सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण होणार !

यामुळे या समाजाच्या विकासासाठी पावले उचलता येतील, असे आसाम सरकारकडून अधिकृतरित्या सांगण्यात आले आहे.

‘ईडी’ची कारवाई सूड घेण्याच्या भूमिकेतील नसावी ! – सर्वोच्च न्यायालय

अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) पारदर्शक, निष्पक्षता आणि सत्यतेचे मूलभूत मापदंड यांचे पालन केले पाहिजे. ‘ईडी’ची कारवाई सूड घेण्याच्या भूमिकेतून नसावी. तसेच अटकेचे कारण दाखवण्यासाठी केवळ कोठडीचा आदेश देणे पुरेसे नाही.

सिक्कीममध्ये ढगफुटी : तिस्ता नदीला आलेल्या पुरामुळे हाहा:कार !

सिक्कीममध्ये ४ ऑक्टोबरच्या रात्री दीड वाजता अचानक आलेल्या पुरामुळे हाहा:कार माजला. उत्तर सिक्किममधील ल्होनाक तलावाच्या वर ढगफुटी झाल्याने लाचेन खोर्‍यातील तिस्ता नदीची पाणी पातळी तब्बल १५-२० फुटांनी वाढली. या पुरामुळे भारतीय सैन्याचे २३ सैनिक बेपत्ता झाले.

पोलिसांकडून धर्मांध मुसलमानांवर कारवाई होत नसल्यावरून हिंदूंचा संताप !

कर्नाटकात काँग्रेस सरकार असल्यामुळेच अशी स्थिती आहे, हे आता काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंनी लक्षात घ्यावे !

‘पाकिस्तान अन्टोल्ड’ संघटनेने घेतले १ सहस्र २०० हिंदु शरणार्थी मुलांना दत्तक !

विनामूल्य शिक्षण देण्याची केली व्यवस्था !
अर्थसाहाय्य करण्याचे केले हिंदूंना आवाहन !