पोटच्या मुलांचा सांभाळ करू न शकल्याने ३ मुलींना पाजले विष

जालंधर (पंजाब) – बिहारमधील कटिहार येथील एक जोडपे त्यांच्या ४ मुली आणि १ मुलगा यांसह कानपूर, जालंधर येथे रहात होते. या जोडप्याने स्वत:च्या ३ मोठ्या मुलींना विष मिसळलेले दूध प्यायला दिले. तिन्ही मुलींचा तडफडून मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आई-वडिलांना अटक केली आहे.
जाति गिनने वाले बिहार से कमाने पंजाब आए सुशील मंडल, फिर भी पेट भरने को पड़े लाले तो तीन बेटियों को दूध में जहर देकर मार डाला#Punjab #jalandhar #murdershttps://t.co/nytohc1UP1
— ऑपइंडिया (@OpIndia_in) October 4, 2023
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सुशील मंडलला दारू पिण्याचे व्यसन होते. त्याची कमाई अल्प होती. त्यामुळे पाचही मुलांचा सांभाळ करू शकत नसल्याने त्याने पत्नीच्या साहाय्याने स्वत:च्या ३ मोठ्या मुलींची हत्या केली. स्वत:च्या बचावासाठी सुशील आणि त्याची पत्नी मंजूदेवी यांनी मुलींचे अपहरण झाल्याचे खोटे कथानक रचले; पण पोलिसांनी झडती घेताच सत्य घटना समोर आली. पोलिसांनी सुशील मंडल आणि त्याची पत्नी मंजूदेवी यांना अटक केली. या जोडप्याची उर्वरित दोन मुले अनुष्का (२ वर्षे) आणि शनी (१ वर्ष) यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !
Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !
CPI Vandalized Toll Gate : माकपच्या कार्यकर्त्यांकडून पथकर नाक्यावर शुल्क न भरता दादागिरी : तात्पुरता अडथळा तोडून पलायन