उत्तरप्रदेशात मदरशांमध्ये विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धीमत्तेचे शिक्षण देणार !

(कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजे मानवाप्रमाणे विचार करू शकणारी यंत्रे बनवण्याचे शास्त्र. या तंत्रज्ञानामुळे मानवाची कार्यक्षमता वाढते.)

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील १६ सहस्र ५१३ मदरशांमध्ये शिकणार्‍या १३ लाख ९२ सहस्र विद्यार्थ्यांना ‘कृत्रिम बुद्धीमत्ता’ (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) विषयीचे शिक्षण देण्यात येणार आहे. अल्पसंख्याक कल्याण मंत्रालयाने मदरशांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळण्याच्या दृष्टीने नवीन तंत्रज्ञान शिकवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मदरशांमध्ये शिकवणार्‍या शिक्षकांना ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चे प्रशिक्षण दिले जाईल, असे अल्पसंख्याक कल्याण, वक्फ आणि हज मंत्री धरमपाल सिंह यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका 

मदरशांमध्ये राष्ट्रघातकी शिक्षण देऊन मुलांचा बुद्धीभेद केला जात असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. असे असतांना त्यांना कुत्रिम बुद्धीमत्तेचे शिक्षण दिल्यास त्याचा वापर राष्ट्रविघातक आणि देशविघातक कारवायांसाठी झाला, तर त्यात आश्‍चर्य ते काय ?