(म्हणे) ‘मला अपेक्षा आहे की, तालिबान इस्लामी नियमांच्या आधारावर चांगले शासन करील !’ – फारूक अब्दुल्ला

यातून फारूक अब्दुल्ला यांच्यासारख्यांची खरी मानसिकता स्पष्ट होते ! प्रत्येक धर्मांधाला त्याच्या धर्मानुसार म्हणजे शरीयतनुसारच जगात राज्य व्यवस्था हवी आहे; जेथे ती शक्य नाही, तेथे ते तसे करण्याच्या प्रयत्नात असतात, हे हिंदूंना कधी लक्षात येणार ?

‘अपनी पार्टी’ परकीच !

काश्मीरमध्ये ‘जम्मू-काश्मीर अपनी पार्टी’ नावाचा नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्यात आला आहे. ‘पीपल्स डेमोक्रॅटिक पक्ष’ म्हणजे ‘पीडीपी’त पूर्वी कार्यरत असलेले तत्कालीन अर्थमंत्री सईद अल्ताफ बुखारी यांनी हा पक्ष स्थापन केला आहे.