Farooq Abdullah Article 370 : (म्हणे) ‘कलम ३७० पुन्हा आणता येईल, त्यासाठी आम्हाला २०० वर्षेही लागू शकतील !’ – फारूक अब्दुल्ला

फारूक अब्दुल्ला यांचे दिवास्वप्न !

नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे खासदार फारूक अब्दुल्ला

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशांनी यापूर्वी निकाल दिला होता की, ‘कलम ३७० कायमस्वरूपी आहे’; पण आता ते रहित झाले आहे. आता बघू पुढे काय होते. विश्‍वासावर हे जग उभे आहे. हेही दिवस जातील. भाजपला कलम ३७० हटवण्यासाठी ७० वर्षे लागली. ते परत आणता येईल, कदाचित् त्यासाठी आम्हाला २०० वर्षे लागतील, असे विधान नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे खासदार फारूक अब्दुल्ला यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना केले. सर्वोच्च न्यायालयाने काश्मीरसाठीचे कलम ३७० रहित करण्याच्या सरकारच्या निर्णयाला योग्य ठरवल्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्‍नावर अब्दुल्ला यांनी वरील उत्तर दिले.

संपादकीय भूमिका

‘कलम ३७० पुन्हा आणता येईल’, असे म्हणणारे फारूक अब्दुल्ला काश्मीरमधून जिहादी मुसलमानांनी हाकलून लावलेल्या हिंदूंना परत काश्मीरमध्ये आणण्याविषयी मात्र मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !