NC’s Omar Abdullah Defeat : काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव !

तिहार कारागृहातून निवडणूक लढवलेला अपक्ष उमेदवार अब्दुल राशिद शेख विजयी

ओमर अब्दुल्ला

श्रीनगर – केंद्र सरकारने कलम ३७० रहित केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये प्रथमच लोकसभेची निवडणूक झाली. जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. ‘यूएपीए’च्या अंतर्गत तिहार कारागृहात बंदिस्त असलेले अपक्ष उमेदवार अब्दुल राशिद शेख हे बारामुल्ला मतदारसंघातून विजयी झाले आहेत. ओमर अब्दुल्ला यांनी पराभव मान्य करत अपक्ष उमेदवार अब्दुल राशिद शेख यांचे अभिनंदन केले आहे.