जम्मू आणि काश्मीर येथे पसरणारे ‘रोहिंग्या मुसलमानांचे जाळे’ किती धोकादायक आहे ?
१५ वर्षांपूर्वी जम्मूमध्ये २०० रोहिंग्या मुसलमान होते. सध्या ११,००० पेक्षा अधिक रोहिंग्या असल्याचे अनुमान आहे. त्यांच्या वस्त्या लष्करी छावण्या, रेल्वेस्थानक, पोलीस वसाहत इत्यादी संवेदनशील भागांजवळही आहेत. मानवी तस्करी, अमली पदार्थांची तस्करी आणि इतर अनेक गुन्हे यांमध्ये रोहिंग्यांचा सहभाग असल्याचे आरोप होत आहेत. जम्मू-काश्मीरमधील रोहिंग्यांच्या वाढत्या संख्येचा अपलाभ पाकिस्तान घेऊ शकतो.