US On India Pak : (म्हणे) ‘आम्ही यात पडणार नाही; पण भारत-पाकिस्तान यांनी तणाव टाळावा !’ – अमेरिका

एकीकडे ‘आम्ही भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये पडणार नाही’, असे म्हणायचे आणि दुसरीकडे भारताला यावरून फुकाचा सल्ला द्यायचा, याला काय म्हणावे ?

समान नागरी कायद्याचा पुनरुच्चार !

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत १४ एप्रिलला लोकसभा निवडणुकीसाठीचे घोषणापत्र प्रकाशित केले आहे. या घोषणापत्रामध्ये समान नागरी कायदा करण्याचा पुनरुच्चार करण्यात आला आहे.

CPI(M) MANIFESTO : माकपच्या घोषणापत्रात भारताने अण्वस्त्रे नष्ट करून देशाला शक्तीहीन करण्याचे घातक आश्‍वासन !

अशा प्रकारचे राष्ट्राघातकी आश्‍वासन देऊन जनतेकडून मते मागणार्‍या पक्षावर बंदी घालून त्याच्या नेत्यांना कारागृहात डांबवण्याची मागणी जनतेने आतापर्यंत करणे आवश्यक होते. अशी मागणी न होणे हे भारतियांना लज्जास्पदच म्हणावे लागेल !

(म्हणे) ‘चीन-भारत संबंध शांतता आणि विकास यांसाठी अनुकूल !’ – माओ निंग, प्रवक्ते, चीन

चीनचा भारतासमवेतचा इतिहास पहाता तो विश्‍वासघातकीच असल्याचे दिसतो. त्यामुळे भारत चीनसमवेत कधीही सकारात्मक विचार करून गाफील राहू शकत नाही !

PM Modi On Heatwave : पंतप्रधान मोदी यांनी घेतली उष्णतेच्या परिस्थितीविषयी आढावा बैठक !

पंतप्रधान मोदी यांनी केंद्र, राज्य आणि जिल्हा स्तरावरील सर्व सरकारी संस्था यांना एकत्रितपणे काम करण्यास सांगितले.

Modi Greeted Maldives President : पंतप्रधान मोदी यांच्याकडून मालदीवच्या राष्ट्रपतींना ईदच्या शुभेच्छा !

पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, ईदचा हा विशेष सण जगभरातील लोकांना करुणा, बंधुता आणि एकता यांची आठवण करून देतो.

पंतप्रधान मोदी भारताचा चेहरा बनले आहेत ! – अमेरिकी खासदार ब्रॅड शर्मन

वर्ष २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली विकासकामे आणि देशाची आर्थिक प्रगती यांसाठी अमेरिकी खासदार ब्रॅड शर्मन यांनी त्यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे भारताचा चेहरा बनले आहेत.

महायुतीला पाठिंबा द्या ! – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला पाठिंबा द्या, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर केले.

काँग्रेससह इंडिया आघाडीतील पक्षांनी स्वतःच्या परिवाराचा विकास केला ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

काँग्रेस समस्यांची जननी असून काँग्रेससह इंडिया आघाडीतील पक्षांनी स्वतःच्या परिवाराचा विकास केला आहे. जेव्हा इंडिया आघाडीवाले षड्यंत्र रचून राज्यातील सत्तेवर आले. त्या वेळीही त्यांनी स्वत:च्या कुटुंबाचा (परिवाराचा) विकास केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळे महायुतीची अनुकूलता विजयात परावर्तित होईल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जेव्हापासून हिंदुत्वाचे सूत्र मनसेने हाती घेतले, तेव्हापासून त्यांची आणि आमची जवळीक वाढली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्ष २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांना जाहीरपणे पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती.