गेल्या आठवड्यात धर्मांधांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !

अतिक अहमद आणि अश्रफ अहमद यांची हत्या

पत्रकाराच्या रूपात तेथे आलेल्या ३ जणांनी पाठीमागून येऊन कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा गुंड भाऊ अश्रफ अहमद यांची डोक्यात गोळ्या झाडून हत्या केली. तिघांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करल्यावर त्यांना अटक करण्यात आली.

भूमीच्या वादातून थोरल्या भावाकडून सख्ख्या धाकट्या भावाची हत्या

वडिलोपार्जित भूमीवरून न्यायालयात चालू असलेल्या खटल्याच्या पार्श्‍वभूमीवर कोरेगाव तालुक्यातील किन्हईजवळ गणेशवाडी येथे थोरल्या भावाने सख्ख्या धाकट्या भावाची हत्या केली. 

देहलीत भाजपच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या !

गुंडांना पोलिसांचा जराही वचक राहिला नसल्यानेच ते दिवसाढवळ्या कुणाचीही हत्या करू धजावतात ! हे चित्र पालटण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे !

देहलीच्या तिहार कारागृहात बंदीवान गुंडांच्या टोळीयुद्धात एका गुंडाचा मृत्यू, तर ४ गुंड घायाळ

बाहेर गुंडगिरी करणार्‍यांना पकडून कारागृहात टाकल्यानंतरही ते तेथे अशाच प्रकारची कृत्ये करू शकत असतील, तर कारागृहातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती किती दयनीय आहे, हेच आपल्या लक्षात येते !

वाढत्या गुन्हेगारीमुळे पिंपरी (पुणे) शहर असुरक्षित !

जानेवारी ते मार्च या ३ मासांच्या कालावधीत शहरात १४ हत्या, ६९ बलात्कार, ९३ लूटमार आणि ४० दंग्याच्या घटना घडल्या.

बेमेतरा (छत्तीसगड) येथे विहिंपकडून मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यावर आर्थिक बहिष्कार टाकण्याची शपथ !

(म्हणे) ‘विरोधकाकडून धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न !’ – मुख्यमंत्री भूपेश बघेल (काँग्रेस आतापर्यंत हेच करत असल्याने हिंदूंनी तिला केंद्रातील सत्तेतून हटवले असतांनाही त्याची काँग्रेसला जाणीव नाही, हे लक्षात येते !)

कुख्यात गुंड अतिक अहमद याचा मुलगा असद पोलीस चकमकीत ठार

उत्तरप्रदेशमधील कुख्यात गुंड अतिक अहमद याचा मुलगा असद हा पोलीस चकमकीत ठार झाला. त्याच्यासह गुलाम नावाच्या गुंडही मारला गेला आहे.

भटिंडा (पंजाब) येथील सैनिकी छावणीतील गोळीबारात ४  सैनिकांचा मृत्यू

आतंकवादी आक्रमण नसून अंतर्गत वादातून घटना घडल्याचा दावा

तुमसर (जिल्हा भंडारा) येथील बहुचर्चित सोनी हत्याकांडातील ७ दोषींना आजन्म जन्मठेपेची शिक्षा !

वर्ष २०१४ मधील  बहुचर्चित सोनी हत्याकांडाचा ११ एप्रिल या दिवशी अंतिम निकाल लागला. तुमसर येथील सोन्या-चांदीचे व्यापारी तुमसर शहरातील रामकृष्णनगर येथे रहाणारे संजय सोनी, पूनम सोनी, ध्रुमिल सोनी या एकाच कुटुंबातील तिघांची अतिशय निर्घृणपणे हत्या झाली होती.